Saturday, June 15, 2024
spot_img
Homeराज्यमालेगाव | खोटी तक्रार व पोलिसांची दिशाभूल करणे पडले महागात…पैसे लुटून नेण्याचा...

मालेगाव | खोटी तक्रार व पोलिसांची दिशाभूल करणे पडले महागात…पैसे लुटून नेण्याचा केला बनाव…

मालेगाव – चंद्रकांत गायकवाड

मालेगांव – पोलिसांना खोटी माहिती देऊन दिशाभूल करणे पडले महागात दि.12 जानेवारी रोजी तक्रारदार प्रकाश पुंडलिक पळसकर वय 65 वर्षे+1 रा. डोनगाव जि. बुलडाणा हे पोलीस स्टेशन मालेगाव येथे तक्रार देण्याकरिता आले की ते व त्यांचे साथीदार डोणगाव येथून मेडशी येथे जात असताना मालेगाव बायपास येथे दोन इसम पल्सर गाडीवर आले व तक्रारदार यांचे मोसावर ठेवलेली 5,00,000/₹ रुपये पैशाची बॅग घेऊन अकोला च्या दिशेने पळून गेले आहे.

अशा माहितीवरून पोलीस स्टेशनचे वरील पोलीस स्टॉप यांनी घटनास्थळावर तात्काळ भेट देऊन संशयित आरोपीची शोधाशोध केली. परंतु तक्रारदार व त्यांचे साथीदार यांची कसून चौकशी केली असता त्या दोघांनी पैसे लुटून नेल्याचा बनाव केला आहे.

असे निष्पन्न झाले असता यावरून माननीय पोलीस निरीक्षक चौधरी यांनी इसमावर पोलिसांची दिशाभूल करणे व पोलिसांना खोटी तक्रार देणे या संबंधाने कलम 182 ipc प्रमाणे कारवाई करण्यात आली यावेळी पोलीस स्टेशन मालेगाव येथील तपास पथक PI संजय चौधरी. यांच्या नेत्तृत्वात Api योगेश धोत्रे,Asi सैबेवार,कैलाश कोकाटे सुनिल पवार शिवाजी काळे जितु पाटील,अमोल पवार यांणी काम बघीतले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: