अहमदपूर पाणी पूरवठ्याचे काम जलद गतीने करा..!सम्राट मित्रमंडळाची मागणी…!

अहमदपूर – बालाजी तोरणे पाटील

अहमदपूर शहरासाठी मंजूर झालेल्या शहर पाणी पूरवठा योजनेचे काम जलद गतीने पूर्ण करून जनतेची होणारी गैरसोय टाळावी अशी आग्रही मागणी सम्राट मित्रमंडळाच्या वतीने यूवकनेते डाॅ सिध्दार्थकूमार सूर्यवंशी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात पूढे म्हटले आहे की,नगरोत्थान योजनेतून अहमदपूर शहरा साठी कायम स्वरूपी पाणी पूरवठा योजना तत्कालीन आमदार विनायकराव पाटील यांनी मंजूर केली आहे.आज सदरील पाणी पूरवठ्याचे कामे चालू आहेत.

मात्र सदरील कामे संबंधीत कंत्राटदार अतिशय संथ गतीने करीत आहे.सदरील कामाची मुदत सूध्दा संपली आहे मात्र जिल्हाधिकारी लातूर यांनी या कामास आठ महिन्यांची मुदतवाढ स्वतःच्या अधिकारात दिलेली आहे.

असे असताना सूध्दा कंत्राटदाराने कामाची गती वाढविणे गरजेचे असताना सूध्दा अतिशय संथ गतीने काम करीत आहे.त्यामूळे शहरवासीयांना मोठ्या अडचणीला तोंड द्यावे लागत आहे.अद्याप पाईप लाईन अंथरण्याचेच काम चालू असून इतर बरेच कामे शिल्लक आहेत.

त्या साठी उर्वरीत मुदतीत काम पूर्ण करण्यासाठी बारचार्ट तयार करून अतिशय युध्दगतीने कामाचे नियोजन करून काम पूर्ण करावे.या निवेदनाच्या प्रती अधिक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांना दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here