थकीत करापोटी पालीकेने माहेश्वरी भवन केले सिल…

तब्बल ९ लाख ४८ हजार कर थकीत…

दर्यापूर – किरण होले

नगरपालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी व्यापारी संकुले,मंगल कार्यालये आदी व्यावसायिक प्रतिष्ठाने आहेत. प्रतिदिन येथे लाखो रुपयांची उलाढाल होत असतांना अनेकदा नोटीस बजावूनही शेकडो व्यावसायिकांकडे मालमत्ता कर थकीतच आहे.

नगर पालिका प्रशासनाने व्यावसायिक, व घरगुती मालमत्ता धारकांना नोटीस देऊन थकीत कर भरण्यास अनेकदा सुचीत केले होते.दरम्यान मार्च एंन्डिंगच्या तोंडावर मंगळवारी धडक मोहीम राबवून बनोसा परिसरातील माहेश्वरी भवन धारकाकडे ९ लाख ४८ हजार कर थकीत असल्यामुळे जप्तीची कारवाई करीत भवनच्या मुख्य सभागृहाला सिल लावले आहे.

या कारवाईने ईतर व्यवसायीकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.कारवाई करतेवेळी कर अधिकारी शैलैष जळकोटे, राहुल देशमूख, आशिष गिरी, गजानन साळुंखे सहभागी होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here