महेश बँकेकडून महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब व महेश बँकेचे संचालक रविकिरण तोडकर साहेब (सी.ए.) यांना श्रद्धांजली अर्पण…

अहमदपूर – बालाजी तोरणे

अहमदपूर येथील महेश अर्बन को- ऑप. बँक लि. येथे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब व महेश बँकेचे संचालक रविकिरण तोडकर साहेब ( सी.ए. ) यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

माजी मुख्यमंत्री, स्वातंत्र्य सेनानी शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांचे अचानक निधन झाल्यामुळे महाराष्ट्रातील कुशल संघटक, चारित्र्यसंपन्‍न, विकासाची दृष्टी असणारे व कार्यकर्ता व सहकार्‍याला आपल्या कुटुंबासारखे वागविणारे, महाराष्ट्राचे विकासपुरूष गमावले असल्याची भावना बँकेचे जेष्ठ मार्गदर्शक संचालक आमदार बाबासाहेब पाटील साहेब यांनी व्यक्‍त केली.

पुढे बोलताना आमदार पाटील म्हणाले की, निलंगेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही विविध क्षेत्रात कार्य केलेले आहे. त्यांचे प्रेम व विश्‍वास सातत्याने लाभत असे, ते मुलाप्रमाणे मला वागवत असत. त्यांच्या अचानक जाण्याचे आम्हा सर्वांची व राज्याची मोठी हानी झाली असल्याचे सांगून.

निलंगेकर साहेब व बँकेचे संचालक रविकिरण तोडकर ( सी.ए. ) यांच्या आत्म्यास परमेश्‍वर शांती देवो, अशी प्रार्थनाही त्यांनी यावेळी बोलताना केली. तसेच यावेळी दोन मिनिट स्तब्ध राहून बँकेच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यावेळी सोशल डिस्टंसचे नियम पाळण्यात आले.

यावेळी महेश अर्बन बँकेचे जेष्ठ मार्गदर्शक संचालक आमदार बाबासाहेब पाटील साहेब, उपाध्यक्ष निवृत्तीराव कांबळे, संचालक शिवानंद हेंगणे, संचालक डि.के. जाधव, संचालक विनायकराव भोसले, संचालक आशिष गुणाले, प्र. व्यवस्थापक बी.के. क्षिरसागर साहेब, सहा. व्यवस्थापक एस.एस. रंदाळे रंदाळे साहेब, सतिश पाटील यांच्यासह अधिकारी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here