पालघर जिल्हा कलाध्यापक संघाच्या कार्याध्यक्ष पदी महेंन्द्र पवार यांची निवड…

डहाणू – जितेंद्र पाटील

महाराष्ट्र राज्य कलाध्यापक महामंडळ पुणे संलग्न पालघर जिल्हा कलाध्यापक संघाच्या नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. सन-20 ते 22 या दोन वर्षसाठी झालेल्या निवडीत आचार्य भिसे विद्यालयातील जेष्ठ कलाशिक्षक व पत्रकार महेंन्द्र पवार यांची निवड झाली.तर अध्यक्ष म्हणून ज.म.ठाकूर हायस्कुल चे कलाशिक्षक रूपेश वझे व सचिव म्हणून तारापूर हायस्कूल चे नितीन जैतकर यांची निवड झाली.

पवार हे पूर्वी उपाध्यक्ष पदी कार्यरत होते. गेल्या तीस वर्षा पासून भिसे विद्यालयात कलाशिक्षक म्हणून कार्यरत असून त्यांना कलाविषयक जिल्हा व राज्य पुरस्कार मिळालेले आहेत.अनेक ठिकाणी आपल्या चित्राचें प्रदर्शन केले आहे.या निवडी मुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here