Mahavoice News Bulletin 13 April…दुपारच्या बातम्या

१) देशात एकीकडे कोरोनाच्या संक्रमंनात प्रचंड वाढ होत असताना दुसरीकडे रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या इंजेक्शनची मागणी वाढण्याचं कारण म्हणजे हा कोरोनावर उपचार समजला जात आहे. याआधीही कोरोना रुग्णांवर उपचारासाठी रेमडेसिवीर इंजेक्शनचा वापर केला जात असल्यानं प्रश्न उपस्थित केले होते मात्र, जागतिक आरोग्य संघटनेने ही गोष्ट मान्य केलेली नाही. . आता पुन्हा एकदा जागतिक आरोग्य संघटनेने असे म्हटलं आहे, की असा कोणताही पुरावा मिळत नाही, की हे इंजेक्शन कोरोना रुग्णांवर उपचारासाठी उपयोगी आहे.

२) सोमवारी देशांतर्गत शेअर बाजारात मोठी घसरण झाल्यानंतर मंगळवारी शेअर बाजारात सुधारणा दिसून आली आहे. आज बाजार सुरू झाल्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, एचडीएफसी, लार्सन अँड टुब्रो, एसबीआय आणि अ‍ॅक्सिस बँक यांच्या समभागात वाढ झाल्याने बाजारात तेजी आली. सुरुवातीच्या व्यापारात सेन्सेक्स 236.71 अंकांनी वधारून 48,120.09 वर, निफ्टी 68.55 अंकांनी वधारून 14,379.35 वर पोहोचला.

३) पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने शिरूर तालुक्याच्या कारेगाव येथे दोन वर्षांपासून खोटे नाव वापरून व्यवसाय करणाऱ्या श्री मोरया हॉस्पिटल येथील बोगस डॉक्टरला स्थानिक गुन्हे शाखेने गजाआड केलं आहे. धक्कादायक म्हणजे, कोरोना काळात या हॉस्पिटलमध्ये एकूण 22 कोविड रुग्ण होते, त्यापैकी 2 व्हेंटिलेटरवर होते त्यातील एकाचा आज सकाळी कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.मिळालेल्या माहितीनुसार कारेगाव येथील मेहमूद फारुक शेख हा डॉ.महेश पाटील नावाने बोगस सर्टिफिकेट घेऊन तो श्री मोरया नावाचे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चालवत असल्याची माहिती खुद्द त्याच्या पार्टनरनेच स्थानिक गुन्हे शाखेला दिली.

४) नागपुरातील कोरोनाचे वाढते संक्रमण ही चिंताजनक बाब होत असून यातच नागपुरातील राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘कोर्ट’ या चित्रपटात मध्यवर्ती भूमिका साकारणारे,आंबडेकरी चळवळीतील गीतकार,पत्रकार व विचारवंत ‘वीरा साथीदार’ यांचे आज कोरोनामुळे निधन झाल्याचे धक्कादायक वृत्त आहे.रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली.नागपुरात राहून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर अभिनयाची छाप पाडणाऱ्या या महान कलावंताच्या अचानक जाण्याने कलाक्षेत्र,साहित्य चळवळीचे मोठे नुकसान झाल्याची प्रतिक्रिया सर्वत्र उमटत आहे

५) 8 एप्रिल रोजी हुगळी येथे निवडणूक जाहीर सभेत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुस्लिम मतांचे विभाजन करू नये. असे विधान केले होते म्हणून निवडणूक आयोगाने त्यांना प्रचारापासून रोखण्याची कारवाई केली होती. या कारणावरून ममता बॅनर्जी कोलकात्यातील गांधी पुतळ्याजवळ निषेध आंदोलन करीत आहेत. ममता बॅनर्जी 12 एप्रिल रोजी रात्री 8 ते 13 एप्रिल रोजी रात्री 8 वाजता कोणत्याही निवडणूक प्रचारात भाग घेणार नाहीत असे सूत्राकडून समजते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here