‘महाव्हाईस न्यूज’…चौथा वर्धापनदिन विशेष…वैचारिक समृद्धीची चार वर्षे

प्रिय वाचक-दर्शक!,
आपण गेल्या चार वर्षांपासून आमच्या बातम्यांना भरभरून प्रतिसाद दिलाय. ‘महाव्हाईस’चे वाचक, दर्शक आतापर्यंत 50 पेक्षा जास्त देशांत आहेत. सोबतच राज्यातील अनेक जिल्ह्यात आघाडीचे बातम्या देणारे चॅनल म्हणूनही ‘महाव्हाईस’ची ओळख आहे. ही ओळख निर्माण झाली ती फक्त आणि फक्त आपल्यामुळेच. या चार वर्षात अनेक आर्थिक अडचणींना मात देऊन तुमच्यापर्यंत बातम्या पोहचविण्याचे काम प्रामाणिकपणे सुरू आहे.

यामुळे माझे मित्र, नातेवाईक, परिवार यांनाही पाहिजे तसा वेळ देता येत नसल्याने त्यांनाही माझ्या बद्दल गैरसमज निर्माण होतो. मात्र, हे सर्व माझ्या वाचकांच्या, दर्शकांच्या सोयीसाठी सुरू आहे आणि यापुढेही सुरूच राहणार.

खरं तर या वर्षीच अमरावती कार्यालयाचे उदघाटनासोबतच 4 था वर्धापनदिन साजरा करायचा होता. त्यासाठी आम्ही तयारीही सुरू केली होती. मात्र, कोरोनाच्या या संकटात हे शक्य नव्हते म्हणून सर्व कार्यक्रम स्थगित केले. यापुढं भविष्यात यापेक्षाही चांगला मोठा कार्यक्रम आयोजित करूयात.

या चार वर्षाच्या कालावधीत अनेक लोकांशी सामना झाला. काही लोकांना ओळखण्यात चूक झाली. अनेकांनी पाय खेचण्याचेही प्रयत्न केलेत. तरी मात्र खाली आलो नाही. हे श्रेय तुमचंच आहे. कारण, या कठीण काळात तुमची भक्कम साथ मला मिळाली. ती भविष्यातही अशीच असू देत.

गजानन गोपाळराव गवई,
मुख्य संपादक,
‘महाव्हाईस न्यूज’ प्रा.ली.,
अमरावती.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here