महाविकास आघाडी एस.टी.कर्मचाऱ्यांचं आंदोलन चिरडण्याचं काम करत आहे – माजी आम.नितीन शिंदे…

सांगली – ज्योती मोरे

आज रोजी सांगली आगारातील एस टी कर्मचाऱ्याच्या पाचव्या दिवशीही सुरू असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन माजी आमदार नितीन शिंदे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधला यावेळी शिंदे म्हणाले, महा विकास आघाडी सरकार एसटी कर्मचाऱ्यांचे हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत आहे. हे सरकार एकीकडे कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करत आहे.

तर दुसरीकडे बस स्थानकातून खासगी वाहतुकीला, वडाप वाहतुकीला परवानगी देऊन हा संप मोडीत काढण्याचा प्रयत्न करत आहेपरिवहन मंत्री आरोप करतात की, भाजप हे आंदोलन चिघळवत आहे. हे आंदोलन एसटी कर्मचाऱ्यांनी स्वतः उभा केला आहे.

भाजपने विरोधी पक्ष या नात्याने कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवण्याचा फक्त प्रयत्न करत आहे. मंत्र्यांनी भाजप वर आरोप करणं बंद करावं अविनाश मोहिते म्हणाले, या आंदोलनाला वडाप संघटनेने पाठिंबा दिला असताना देखील, आर टी ओ अधिकाऱ्यांनी वडाप मालकांच्या वरती दबाव टाकून एसटी बसस्थानकातून ही पर्यायी वाहतूक सुरू करू संपकरी कामगारांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केला आहे.

यावेळी भाजपा कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्री प्रियानंद कांबळे, कामगार नेते चंद्रकांत सूर्यवंशी, गौस पठाण, अजय काकडे, सुमित शिंगे, भाजपा महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष सौ माधुरी वसगडेकर, महिला मोर्चाच्या सचिव सौ.शोभा ताई बिकट, महिला कामगार आघाडीच्या उपाध्यक्ष प्रीतीताई काळे.

त्याच बरोबर असंख्य एसटी कर्मचारी व भगिनी उपस्थित होत्या आज सांगली आगारातील काही महिला कर्मचार्‍यांनी बस स्थानकामध्ये गाड्या भरून बाहेर पडणाऱ्या वडाप थचालकांना गेटच्या बाहेर गांधीगिरी मार्गाने गुलाबाची फुले देऊन ही पर्यायी वाहतूक थांबवण्याचे कळकळीची विनंती केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here