महाविकास आघाडी महाराष्ट्राला लुटण्याची एकही संधी सोडत नाही – आम.गोपिचंद पडळकर…

सांगली – ज्योती मोरे

माझा महाराष्ट्र खरोखर सोन्यासारखा आहे. पण महाविकास आघाडीचे सरकार दगाफटक्याने सत्तेत आल्यापासनं, महाराष्ट्राला लुटण्याची एकही संधी सोडत नाही. असा आरोप भाजप आमदार गोपिचंद पडळकर यांनी केलाय.मागील दोन वर्षात कोकणाला वादळाने दोन वेळा फटका दिला. शेतकऱ्यांची पीकं दुष्काळात तर कधी ओल्यादुष्काळात माती मोल झाली.

स्वप्नील लोणकर सारखा होतकरू मुलगा आत्महत्या करतो.महाराष्ट्रात लालपरीची सेवा देणाऱ्या तब्बल २८ कर्मचाऱ्यांना पगाराअभावी आत्महत्या करावी लागतेय.
अनेक बारा बलुतेदारांवर, भटक्यांवर आर्थिक चणचणीमुळे आत्महत्या करण्याची वेळे येते.हे सर्व सुरू असताना महाविकास आघाडी सरकार फक्त मदतीचे कागदी घोडे नाचवत आहे. आणि मुळात खरी मदत कधी पोहचतच नाही. असा टोलाही आम.पडळकरांनी लगावलाय.

बाकी सामान्यांच्या निर्णयासाठी महाविकास आघाडीच्या तिघाडीत बिघाडी असते. पण बदलीतून मिळणाऱ्या मलीद्यासाठी एक वाच्यता असते. म्हणूनच महाविकास आघाडीसाठी रोजच दिवाळी आणि दसरा आहे. जनाब राऊत मेंढ्या ह्या शेतकऱ्यांसाठी जीविकेचे साधन आहे. ते दुधही देते आणि ऊबही देते.

हे तुम्हा वसुलीवाल्यांना समजणार नाही.महाराष्ट्रात एकच वाघ होते.. ते म्हणजे आमचे हिंदुंचे हिंदुह्रदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे… तुमच्या सारख्या हुजऱ्यांना वाघाच्या शेपटाचीही उपमा देता येणार नाही. अशी प्रतिक्रियाही आम.पडळकर यांनी पुढे बोलताना व्यक्त कली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here