मूर्तिजापूर | हातगावात महात्मा फुले जयंती कार्यक्रमात बापलेकाचा राडा…

मूर्तिजापूर शहरापासून अगदी जवळच असलेल्या शहर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या हातगाव ग्रामपंचायत मध्ये महात्मा फुले जयंतीचा कार्यक्रम सुरु असताना गावातील दोघा बापलेकांनी सहकाऱ्यांसह येऊन कार्यक्रम दिग्विजय गाढेकर यांना बेदम मारहाण करुन सदर नियोजित कार्यक्रम हाणून पाडण्याचा प्रयत्न केला दरम्यान खुर्चीवर ठेवलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची विटंबना करण्यात आली.

असल्याचा आरोप दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आला.हातगाव ग्रामपंचायत कार्यालयात महात्मा ज्योतिराव फुले नियोजन कार्यक्रम सकाळी १०:३० वाजता सुरु असतांना येथील सुरेश पुंडलीक जोगळे व त्यांचा मुलगा अक्षय जोगळे या बापलेकांनी ग्रामपंचायत मध्ये येऊ नियोजित कार्यक्रमात येऊन धुमाकूळ घातला व तेथे उपस्थित दिग्विजय गाढेकर यांना बेदम मारहाण केली.

दरम्यान बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा ठेवलेली असलेली खुर्ची अक्षय जोगळे याने मारहाणीसाठी उचलली असता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा खाली पडून विटंबना झाली व गावात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप सरपंच अक्षय राऊत यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत व पोलीसात दिलेल्या तक्रारीत केला आहे. येथील नुकतीच ग्रामपंचायत निवडणूक पारपडली असून अक्षय जोगळे हा उपसरपंच निवडणुकीत पराभूत झाला.

हा पराभव जिव्हारी लागल्याने चिडून दिग्विजय गाढेकर यांच्यावर बापलेकांनी सहकाऱ्यांसह हल्ला चढविल्याने सदर प्रकाराला राजकीय किनार असल्याची चर्चा आहे. या संदर्भात सुरेश जोगळे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाही. या प्रकरणी शहर पोलीसांनी ३२४, ३२३ अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here