कृषी विद्यापीठात राष्ट्रपिता महात्मा गांधी तथा माजी पंतप्रधान स्व. लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी…

डेस्क न्युज – संपूर्ण विश्वाला अहिंसेचा मार्ग दाखविणारे महामानव राष्ट्रपिता महात्मा गांधी तथा “जय जवान जय किसान” चा नारा देत शेतकरी तथा सैनिकां प्रति आदर व्यक्त करणारे हरित क्रांती तथा श्वेतक्रांती चे प्रणेते स्वतंत्र भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय लाल बहादुर शास्त्री यांची जयंती विद्यापीठात दरवर्षीप्रमाणे उत्साहात साजरी करण्यात आली.

तथापि covid-19 महामारी च्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळत तथा आरोग्य विषयक नियमांचे पालन करत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत मुख्य प्रशासकीय इमारत येथे कुलगुरू कर्नल कमांडंट डॉ. विलास भाले यांच्या अध्यक्षतेत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विद्यापीठाचे अधिष्ठाता शिक्षण डॉ महेंद्र नागदेवे, संचालक संशोधन डॉ.विलास खर्चे , कुलसचिव डॉ. सुरेंद्र काळबांडे यांचेसह शास्त्रज्ञ, अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती.

राष्ट्रपिता महात्मा गांधी तथा स्वर्गीय लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांचे पूजन, माल्यार्पण तथा दीपप्रज्वलन मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाले. याप्रसंगी कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी “जागतिक अहिंसा दिनाचे” महत्त्व विशद करताना सर्वानीच एकमेकांप्रति सन्मानाची, सद्भावनेची,

मैत्रीची आणि मदतीची भावना वृद्धिंगत करावी व सामाजिक एकोपा जपण्यात सहभागी व्हावे असे आवाहन केले व उपस्थितांना “अहिंसा तथा सद्भावना” शपथ दिली. आजच्या दिनाचे औचित्य साधत डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत कृषी महाविद्यालय अकोला येथे सहयोगी अधिष्ठाता डॉ. शामसुंदर माने यांचे मार्गदर्शनात वर्गखोल्यांची स्वच्छता तथा परिसर स्वच्छता करण्यात आली,

तर उद्यानविद्या महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश नागरे यांचे नेतृत्वात शहर बगीच्याचे नूतनीकृत परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. तसेच कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय महाविद्यालयात अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी डॉ महेंद्र नागदेवे यांचे मार्गदर्शनात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

वनविद्या महाविद्यालय अकोला येथे सहयोगी अधिष्ठाता डॉ श्रीकांत आहेरकर यांचे मार्गदर्शनात परिसर स्वच्छता अभियान राबविण्यात आले तर वनस्पतीशास्त्र विभाग अंतर्गत वृक्ष लागवड कार्यक्रम संपन्न झाला याप्रसंगी कुलगुरू डॉ विलास भाले यांचेसह अधिष्ठाता कृषी डॉ महेंद्र नागदेवे, संचालक संशोधन डॉ. विलास खर्चे कुलसचिव डॉ. सुरेंद्र काळबांडे तथा आयोजक विभाग प्रमुख डॉ. राजाभाऊ घोराडे व त्यांची चमू प्रामुख्याने उपस्थित होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here