तिर्थक्षेत्र लाखपुरी येथील महाशिवरात्री यात्रा रदद…

दि १० मार्च ते दि १२ मार्च ला लाखपुरी मध्ये संचारबंद…

दर्यापूर – किरण होले

अकोला व अमरावती जिल्ह्याच्या सीमेवर असलेले प्रसिद्ध धार्मिक पर्यटन स्थळा निधीत्र श्री लक्षेश्वर संस्थान लाखपुरी ता. मुर्तिजापूर जिल्हा अकोला येथे दरवर्षी महशिवरात्री यात्रा महोत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात येतो.

नउ दिवस चालणाऱ्या या उत्सवात रामकथा भागवत सप्ताह समाज प्रबोधन कार्यक्रम, आरोग्य शिबिर, गुणवत्ता प्राप्त विघ्यार्थी सत्कार , सोहळा, कीर्तन भजन संध्या महाप्रसाद श्रीची भव्य मिरवणुक, दहीहांडी इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.

परंतु अकोला जिल्हयात व मुर्तिजापूर तालुक्यातील कोरोना चा वाढता प्रभाव पाहता दरवर्षी होणाऱ्या लाखपूरीमध्ये यात्रा महोत्सव रद्द केला. असून प्रशासनाच्या वतीने दी 10 मार्च ते दि 12 मार्च पर्यंत लाखपुरी प्रतीबंधीत क्षेत्र घोषित केले आहे करिता गाविकांनी आपाआपल्या घरीच पुजा करुन भगवान श्री लक्षेश्वराचा आशीर्वाद घ्यावा.

असे आव्हान श्री लक्षेश्वर संस्थानच्या वतीने पत्रकार परिषदेच्या वेळी करण्यात आले आहे. यावेळी उपविभागीय अधिकारी अभय सिंग मोहिते, मुर्तिजापूर ग्रामीण ठाणेदार रहीम शेख, नायब तहसीलदार मिसळ, सरपंच अजय तायडे, उपसरपंच राजू केत्वा, पत्रकार विलास नसले, गजानन देशमुख, यांच्या सह प्रशासनाचे अधिकारी व मुर्तिजापूर , दर्यापूर तालुक्यातील सर्व पत्रकार मंडळी यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here