मिरजेत विविध मागणीसाठी महाराष्ट्र राज्य अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी महासंघा तर्फे एक दिवसीय लाक्षणिक संप…

सांगली – ज्योती मोरे

अशासकीय अनुदानित महाविद्यालयिन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या  विविध प्रलंबित मागण्यासाठी आज राज्य भरातील महाविद्यालयाच्या बाहेर एक दिवसाचे लाक्षणिक संप आंदोलन  सुरू करण्यात आले होते.

शासनास वारंवार पत्रव्यवहार करूनही कर्मचाऱ्यांच्या मागण्या कडे दुर्लक्ष करत असल्यामुळे महासंघाणे आता आंदोलन भूमिका घेतली आहे सेवक कृती समितीच्या बैठकीत आंदोलनाची भूमिका ठरविण्यात अली होती.मिरज महाविद्यालया बाहेर शिकक्षेतर कर्मचारी आंदोलनास बसले होते,यावेळी माजी आमदार शरद पाटील यांनी आंदोलनास पाठींबा देऊन याचा पाठपुरावा राज्य शासनाकडे करणार असल्याचे सांगितले,

महाराष्ट्र राज्य अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघ चे विभागीय अध्यक्ष महेश नीलाजे,महासंघाचे उपाध्यक्ष प्रवीण पाटील,महासंघाचे सचिव मारुती धोत्रे,राज्य कार्यकारणी सदस्य विनोद म्हेत्रे,जिल्हा कार्यकारणी सदस्य विनोद गोसावी,शर्मा महाराष्ट्र मागासवर्गीय यंत्रमाग संस्थेचे चेअरमन प्रमुख कोरे,सर उपस्थिती होते.आज सांगली कोल्हापूर सातारा विभागीय 15 हजार शिक्षकेतर कर्मचारी या आंदोलनात सामिल झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here