महाराष्ट्र राज्यचे प्रधान मुख्य वनसंरक्षक व वनबल प्रमुखाचे वन मजूर व कर्मचारी संघटने तर्फे स्वागत…कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत दिले निवेदन…

नागपूर – शरद नागदेवे

महाराष्ट्र राज्यचे प्रधान मुख्य वनसंरक्षक व वनबल प्रमुख जी.साईप्रकाश यांचे महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटना तसेच मा.रा.वनमजूर , वनकर्मचारी व वनक्षेत्रीय कर्मचारी संघटनेच्या वतीने स्वागत करण्यात आले.यावेळी राज्यातील क्षेत्रीय कर्मचाऱ्यांचा प्रमुख मागण्या व सेवावीषयक समस्यांबाबत त्यांना निवेदन सादर करण्यात आले.

गत‌ काही वर्षांपासून वूक्षलागवडीसह वन्यप्राणी,वन आधारित ग्रामीणानां रोजगार देणारे विविध प्रकल्प यशस्वीरीत्या राबविण्यात आले आहे.वनक्षेत्रात वन्यप्राणी संख्येत निरंतर वाढ होत असल्याचे राष्ट्रीय पातळीवर विविध अहवालानुसार दिसून येते आहे.या कार्यात प्रत्यक्ष सहभागी वनरक्षक,वणपाल वेतन व सर्वच सेवासुविधेत इतर विभागाचा तुलनेत खूप मागे आहेत.याबाबतच्या मागण्यांचे निवेदन शासनास सादर करण्यात आले आहे.

निवेदणातील प्रमुख मागण्या.. – पोलिस व महसूल विभागातील पदसंरचणेनुसार समान न्यायतत्वावर वनरक्षक-वणपाल यांना वेतन श्रेणी सेवा सुविधा मीळणे,पोलीस विभागा प्रमाणे वेतन भत्ते मीळवे, अतिदुर्गम क्षेत्रात वस्तीसाठी मोटरसायकल‌ पुरवठा, साप्ताहिक रजा,रजा कालावधीत वेतन, वनरक्षक-वणपाल सेवावीषयक लाभ मीळणे,

महिला प्रवर्गातील वनरक्षक-वणपाल यांच्या कामाचे तास निर्धारित करुन अतिसंवेदनशील क्षेत्रात जोखमेची कामगीरी न देण्याबाबत, महिलांसाठी कामाचा ठीकानी प्रसाधन गुहाची व्यवस्था करणे, अंती संवेदनशील क्षेत्रातील वनसंरक्षण वन्यप्राणी संरक्षण,अतिक्रमणाचे गुन्हे दाखल करणाऱ्या वनरक्षक-वणपालावर मोठ्या प्रमाणात होणारे प्राणघातक हल्ले याबाबत योग्य कारवाई करूण सुरक्षा पुरविण्यात यावी.

वनसंरक्षणाच्या मापदंडानूसार गुन्हे निहाय तपासाची जवाबदारी निश्चित करणे,प्रभावी वनसंरक्षण यंत्रणा राबविने,शत्र व शत्रनीतीत आवश्यक बदल करणे व प्रभावी करण्याबाबतचा प्रलंबित मागण्या यावेळी निवेदनातून सादर करण्यात आल्या.

संबधित निवेदन संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष अजय पाटील यांचा प्रमुख उपस्थितीत देण्यात आले.याप्रसंगी संघटनेचे पदाधिकारी कार्याध्यक्ष माधव मानमोडे,विशाल मंत्रवार,दादा खटूले,संजय माघाडे,रविंद्र बखाल,भारत मडावी,यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here