अपंग बांधवाच्या मागणी करीता महाराष्ट्र नवनिर्माण सेना उत्तर नागपूर विधानसभा आक्रमक…

नागपूर – शरद नागदेवे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना उत्तर नागपूर विधानसभा यांनी महानगरपालिका उपायुक्त राजेश भगत यांना अपंग व्यक्तींना या नागपूर महानगरपालिका अंतर्गत व्यवसायिक प्रतिष्ठान देन्याकरीता निवेदन देण्यात आले.

निवेदनात त्यांना सांगितले की १४८८ अर्ज मागिल कीती तरी वर्षांपासून आपल्या विभागाकडे प्रलंबित आहेत शासन निर्णय क्र. टि.पि.ब./४३९६/१५४३/प्र. क्र.२/९८/नवि ११नुसार धोरण तयार करून ज्या प्रमाने गठ ई कामगार यांना स्टाॅल देन्यात आहे त्यांच प्रमाने अपंग व्यक्तींना सुध्दा देन्यात यावे.

शासनाने ५ टक्के जागा व फंड अपंग बांधवांना राखिव ठेवला आहे त्याचा उपयोग लवकारत लवकर करुन मागणी मान्य करावी. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंदोलन करेल. असे त्यांना सांगण्यात आले. त्यावर त्यांनी लवकरच तोडगा काढुन आपली मागणी मान्य करु अशी हमी दीली.

या प्रसंगी विभाग अध्यक्ष उत्तर नागपूर उमेश बोरकर.विभाग सचिव महेश माने विभाग सहसचिव सुनिल गवई.उपाध्यक्ष लाला ससाने उपाध्यक्ष नरेंद्र पाटील.विभाग उपसंघटक मोहीम देसाई. विभाग सहसचिव बबलू गायकवाड. कार्यालय अध्यक्ष रामभाऊ हेडाऊ प्रभाग क्रमांक २ अध्यक्ष शुभम लोखंडे व मनसैनिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here