नेहरू युवा केंद्र अकोला, स्वामी विवेकानंद युवा मंडळ नर्सिपुर पंचगव्हाण तर्फे महाराष्ट्र कबड्डी दिन साजरा…

तेल्हारा – गोकुळ हिंगणकर

तेल्हारा तालुक्यातील पंचगव्हाण येथे नेहरू युवा केंद्र अकोला,स्वामी विवेकानंद युवा मंडळ नर्सिपुर पंचगव्हाण तर्फे महाराष्ट्र कबड्डी दिन श्री.रुद्रनाथ स्वामी संस्थान येथे साजराकरण्यात आला.या वेळी मंडळातील तरुणांनी खेळातील नियम समजून घेतले तसेच मंडळातील काही तालुक्का पातळीवर खेळलेल्या तरुणांचा अनुभव कामी आला,

या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी नेहरू युवा केंद्र तालुक्का समन्वयक, विकी वाघ यांनी परिश्रम घेतले तसेच कार्यक्रमाला युवा मंडळाचे गणेश आगरकर, विजय चवरे,शंकर धारपवांर, धनंजय झटाले, सोपान चांदूरकर, सचिन भामोद्रे, पांडुरंग चवरे,प्रफुल्ल आगरकर, गोपाल गावंडे, मंगेश बावणे,विनोद आगरकर, श्याम कानपूरे, संजय बावणे, व गावातील नागरिक आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here