महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समिती…

बांधकाम कामगारांच्या महत्त्वाच्या मागण्यासंबंधी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बांधकाम कामगारांचे जोरदार आंदोलन!

सांगली – ज्योती मोरे

महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांच्या दिवाळीपूर्वीच सर्व मागण्या मंजूर करा साठी सांगली जिल्ह्यामध्ये सांगली येथील निवारा भवन येथे सोमवार दिनांक 25 ऑक्टोबर रोजी बांधकाम कामगारांचा भव्य मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यामध्ये बोलताना कॉ शंकर पुजारी यांनी सांगितले की, मागील दोन वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागण्यांची पूर्तता करण्याबाबत अनेक वेळा निवेदन देऊनही महाराष्ट्राचे कामगार मंत्री निर्णय घेण्यास तयार नाहीत.

आम्ही संघटनेच्या वतीने पाठवलेल्या निवेदनाची मुख्यमंत्र्यांनी मागील सहा महिन्यांमध्ये सात वेळा दखल घेतलेली आहे अगदी 22 ऑक्टोबर 2021 रोजी सुद्धा त्यांनी आमचे निवेदन मिळाले असे कळवून ते निवेदन कामगार विभागाकडे पाठवलेले आहे त्याची पोच या सोबत जोडलेली आहे .परंतु कामगार विभाग मात्र जागे होण्यास तयार नाही.

त्याऐवजी कामगारांच्या दृष्टीने मुख्य मागण्या बाजूला ठेवून पाच हजार रुपये बोनस देण्यात येईल अशी घोषणा कामगार मंत्र्यानी केली आहे .परंतु याबाबत अजून जीआर निघाल नाही आणि इतर मागण्या यांच्याबद्दल त्यांनी काही स्पष्ट केले नाही. म्हणूनच सत्तावीस तारखेला बुधवारी आम्ही सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संघटनेच्यावतीने निदर्शने करीत आहोत.

सर्व देशांमध्ये बांधकाम कामगार यांच्या मुलींच्या विवाहासाठी 51 हजार रुपये आर्थिक साहाय्य केले जाते. परंतु महाराष्ट्रामध्ये मात्र नोंदीत प्रत्येक कामगारांना त्यांच्या मुलीच्या विवाहसाठी 51 हजार रुपये देण्याच्या निर्णयास अद्यापि महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिली नाही.विशेष म्हणजे महाराष्ट्र शासनाचे कामगार मंत्री स्वतःच् या मंडळाच्या अध्यक्ष आहेत तरीही ते सही करत नसल्याने बांधकाम कामगार अनेक योजनांचे लाभ मिळण्यापासून वंचित आहेत.

त्यामुळे महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांच्या मध्ये महाविकास आघाडीच्या विरोधी असंतोष वाढत चाललेला आहे.सध्या या महामंडळाकडे कामगारांचे कल्याणकारी योजना राबविण्यासाठी अकरा हजार कोटी रुपये शिल्लक आहेत. तरीही. बांधकाम कामगारांचा मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये देण्याच्या ठरावाला मंजुरी देण्यास महाराष्ट्र शासनाची तयारी नाही.

मागील वर्षी covid-19 या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील दहा लाखापेक्षा जास्त कामगारांना प्रत्येकी पाच हजार रुपये या मंडळाकडून आर्थिक सहाय्य देण्यात आले. परंतु यावर्षी मात्र फक्त पंधराशे रुपये दिलेले आहेत उर्वरित साडेतीन हजार रुपये रक्कम दिवाळीपूर्वी द्यावी अशी मागणी करीत आहोत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक सरकारी कामगार अधिकारी कार्यालयामध्ये पन्नास टक्के पेक्षा जास्त रिक्त पदे आहेत.त्यामुळे बांधकाम कामगारांचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे.

ऑनलाईन कामकाज जलदगतीने व्हाव या व इतर मागण्यांसाठी 27 ऑक्टोबर रोजी सांगली कलेक्टर कचेरीवर मोर्चा काढून 28 तारखेला आझाद मैदान मुंबई येथे वरील मागण्यांच्या साठी बेमुदत उपोषण करण्यात येत आहे. असा निर्णय घोषित करण्यात आला. या महत्त्वपूर्ण मेळाव्यास कॉ शंकर पुजारी, कॉ सुमन पुजारी , कॉ विजय बचाटे , वर्षा गडचे, वंदना कांबळे, हुसेन गवंडी, देविदास राठोड, जोशना पवार, शारदा पाटील इत्यादीनी मेळाव्या मध्ये आपले मनोगत व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here