कोगनोळी जीपीएल स्पर्धेत महालक्ष्मी रायडर्स ठरला विजेता; तर उपविजेता यश वारियर्स…

राहुल मेस्त्री
दिनांक 4 एप्रिल ते आठ एप्रिल पर्यंत खेळविण्यात आलेल्या बसव ज्योती युथ फाउंडेशनच्या वतीने जीपीएल क्रिकेट लीग स्पर्धेत दिनांक आठ रोजी अंतिम सामन्यात संघमालक धनाजी कागले यांच्या महालक्ष्मी रायडर्सने संघमालक प्रीतम शिंत्रे यांच्या यश वारियर्स संघावर मात करून कोगनोळी जीपीएस स्पर्धेतील विजेता म्हणून आपले

नाव कोरले आहे .सदर अंतिम सामन्या तील विजेता उपविजेता आणि तिसरा क्रमांक आलेल्या संघाला बक्षीस व रोख रक्कम वितरण बसव ज्योती युथ फाउंडेशनचे अध्यक्ष युवा नेते बसवप्रसाद जोल्ले आणि ज्योतीप्रसाद जोल्ले यांच्या हस्ते करण्यात आले.

स्वागत व प्रास्ताविक बाळासाहेब कागले ,सर यांनी केले.यावेळी बसवप्रसाद जोल्ले म्हणाले गेल्या एकवर्षापासुन कोरोना मुळे युवकांच्या साठी कोणत्याही मनोरंजनाचे कार्यक्रम झालेले नाहीत म्हणून युवक वर्गाला एकत्र आणण्यासाठी हि संकल्पना आणली आहे असे मनोगत केले.याप्रसंगी कोगनोळी भाजपा प्रमुख कुमार पाटील,सुनील

माने,धनाजी कागले,कुमार व्हटकर,सचिन पाटील,तौफिक मुल्ला,सुनील घुगरे,अमोल नाईक,सचिन निकम,प्रकाश पवार यांच्याअनेक भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते…
तर या स्पर्धेतील बक्षिसे प्रथम क्रमांक 25000₹ व ट्रॉफी,व्दितीय क्रमांक 15000₹ व ट्रॉफी आणि तृतीय क्रमांक ट्रॉफी असे होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here