Wednesday, April 24, 2024
HomeIPL CricketLSG vs RCB | गौतम गंभीर आणि विराट कोहली यांचा हाय व्होल्टेज...

LSG vs RCB | गौतम गंभीर आणि विराट कोहली यांचा हाय व्होल्टेज ड्रामा…IPLने ठोठावला एवढा मोठा दंड…

Share

LSG vs RCB IPL 2023 : इंडियन प्रीमियर लीग 2023 मध्ये, काल सोमवारी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना झाला. कमी धावसंख्येच्या या सामन्यात बरंच काही पाहायला मिळालं. आरसीबी 18 धावांनी विजयी झाली. आरसीबीने लखनौचा १८ धावांनी पराभव केला. या सामन्यादरम्यान विराट कोहलीचा उत्साह पाहायला मिळाला. सामना संपल्यानंतर विराट कोहली आणि लखनऊचा मेंटॉर गौतम गंभीर आणि नवीन उल हक यांच्यात बाचाबाची झाली. यानंतर आयपीएलने तिघांनाही दंड ठोठावला आहे.

आयपीएलच्या आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी विराट आणि गंभीर यांना त्यांच्या सामन्यांच्या शुल्काच्या 100 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. दुसरीकडे, लखनौ सुपर जायंट्सचा गोलंदाज नवीन-उल-हकला त्याच्या मॅच फीच्या 50 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. नवीन-उल-हकने आयपीएल आचारसंहितेच्या कलम 2.21 अंतर्गत लेव्हल 1 गुन्ह्याची कबुली दिली आहे.

नवीन उल हकलाही शिक्षा झाली आहे
विराट कोहली आणि गौतम गंभीरशिवाय आयपीएलच्या प्रशासकीय समितीने वेगवान गोलंदाज नवीन-उल-हकलाही शिक्षा केली आहे. त्याला त्याच्या मॅच फीच्या 50 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यावर IPL आचारसंहितेच्या लेव्हल 2 च्या कलम 2.21 चे उल्लंघन केल्याचा आरोप आहे.

या दोघांशिवाय, लखनऊचा वेगवान गोलंदाज नवीन-उल-हकवर आयपीएल आचारसंहितेच्या लेव्हल 1 च्या कलम 2.21 चे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. तर विराट कोहली आणि नवीन उल हक यांनी आपली चूक मान्य केली आहे. बर्‍याच मीडिया रिपोर्ट्समध्ये काइल मायर्सवर दंडाची बातमी आहे पण हे चुकीचे आहे. आयपीएलने आपल्या प्रसिद्धीपत्रकात याचा उल्लेख केलेला नाही.

याआधी 10 एप्रिल 2023 रोजी लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात सामना खेळला गेला होता. बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात लखनौने शेवटच्या चेंडूवर सामना जिंकला होता. यानंतर संघाचा मार्गदर्शक गौतम गंभीरने मैदानाच्या मध्यभागी जाऊन तोंडावर बोट ठेवून सर्वांना गप्प बसवल्यासारखी प्रतिक्रिया दिली.

यानंतर लखनौच्या एकना स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात विजयानंतर कोहलीनेही असेच केले. हे सर्व गंभीरने केलेल्या कारवाईची प्रतिक्रिया आहे असे मानता येईल. यामागची कारणे काहीही असोत, पण खेळाडूंनी खिलाडूवृत्तीची जोपासना करणे अपेक्षित आहे. तसे न केल्यास आयपीएलकडून दंडही आकारला जातो.

एकना स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात आरसीबीने पहिल्या डावात 126/9 धावा केल्या, प्रत्युत्तरात LSG च्या फलंदाजांनी निराशा केली आणि संपूर्ण संघ 19.5 षटकात 108 धावा करत सर्वबाद झाला. आरसीबीने 62 धावांवर पहिली विकेट गमावली. यानंतर संघाने सातत्याने विकेट गमावल्या. मात्र, कर्णधार फाफ डू प्लेसिसने सर्वाधिक 41 धावा करत संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले.

प्रत्युत्तरात लखनौने पॉवरप्लेनंतर 4 गडी गमावून 34 धावा केल्या. आरसीबीच्या गोलंदाजांच्या अप्रतिम कामगिरीसमोर लखनौच्या फलंदाजांनी निराशा केली आणि संघाला लक्ष्य गाठता आले नाही.


Share
Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: