महाराष्ट्र मध्यप्रदेश सीमा लगतच्या जंगलात प्रेमी युगल ची आत्महत्या…

अमरावती – प्रज्योत पहाडे

१८ जूनपासून मध्यप्रदेशातील सांगली या गावात एक तरुण आणि अल्पवयीन मुलगी फरार झाल्याची घटना घडली होती. ज्यात मुलीच्या कुटूंबियांनी तीन-चार दिवस शोध घेतल्यानंतर मध्य प्रदेश पोलिसात तिच्या हरवल्याचा रिपोर्ट दाखल केला होता,

पण गेल्या १५ दिवसा पासून बेपत्ता असलेल्या या दोघांचाही शोध लागत नव्हता आज या दोघांचा मृतदेह महाराष्ट्रच्या राजपूरच्या जंगलात आढळून आला..पोलीस सूत्रांच्या मिळालेल्या महितीननुसार अरुण समाधान गोमतेरी( 21) यांचे आणि मुलगी वय (16 वर्षे) संशयस्पद अवस्थेत महाराष्ट्राती धारणी जवळच्या जंगलात यांचा मृतदेह सापडला.

ज्याला काही जंगलातील लाकूड तोडणार्यांनी पाहिले आणि त्याची माहिती गावातील नागरिकांना दिली. धारणी पोलिस ठाण्यात संपूर्ण माहिती दिल्यानंतर तरुण आणि मृत मुलीचे मृतदेह स्वविच्छेदना साठी धारणी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. हा तरुण आणि मुलगी १८ जूनपासून घरातून बेपत्ता होते आणि घरातील लोक त्यांचा सतत शोध घेत होते.

मेळघाटचे आमदार राजकुमार यांना घटनेची माहिती मिळाली, राजकुमार पटेल यांनी उपजिल्हा रूग्णालयात जाऊन दोन्ही कुटुंबातील लोकांशी चर्चा केली, तरूण आणि युवतीच्या शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला, पुढील तपास धारणी पोलिस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here