मुंबई – गणेश तळेकर
राज्य राखीव दलाच्या बदल्या १५ वर्षे वरून १० वर्ष व्हाव्या म्हणून समाजसेविका सौ.अश्विनी ( ताई ) अमोल केंद्रे मॅडम यांनी केलेल्या उपोषणाला लोकस्वराज्य फिल्म अँड टेलिव्हिजन ट्रेड युनियन ने जाहीर पाठिंबा दिला आहे.
ठाकरे सरकार ने लवकरात लवकर यावर निर्णय द्यावा आणि जवानांच्या दुःखात सुखाचा पाझर यावा यासाठी GR काढावा.शिवसेनेच्या वचन नाम्यात जवनांबद्दल आपुलकी दाखवली गेली होती मात्र १ वर्ष पूर्ण झाले तरी वचन नामा फक्त कागदावरच राहिला आहे.
यासाठी मा.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब,मंत्री मा.आदित्यजी ठाकरे तसेच गृहमंत्री मा.देशमुख साहेब यांनी त्वरित योग्य तो निर्णय घ्यावा ही विनंती.लोकस्वराज्य फिल्म अँड टेलिव्हिजन ट्रेड युनियन भारत.