“लोकगर्जना” प्रतिष्ठान तर्फे दिवाळी स्नेहमीलन कार्यक्रम संपन्न…

नागपूर – शरद नागदेवे

“लोकगर्जना” प्रतिष्ठानच्या वतीने दिवाळीनिमित्त स्नेहमीलनाचा कार्यक्रम लोकगर्जना प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अजय पाटील यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आला.याप्रसंगी शहरातील विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली.व समस्यांचे निराकरण करण्यासाठी विविध शासकीय विभागात प्रतिष्ठान मार्फत निवेदण देण्याचे ठरविण्यात आले.

विजेच्या, पाण्याचा वाढीव बिलांनबद्दल जनता त्रस्त आहे.संबधीत विभागांचा अधिकाऱ्यांना भेटून त्यावर चर्चा करुण तोडगा काढण्यासाठी प्रतिष्ठणा तर्फे निवेदण देण्याचे येणार आहे.सध्या पालकांना मध्ये शाळेतील वाढीव शुल्क आकारल्या जात असल्याने.त्याबद्ल सुध्दा संतापाची लाट पसरली आहे.

या बदल उपसंचालक शिक्षण, नागपूर विभाग व शिक्षणाधिकारी यांना निवेदन सादर करून त्यांचाशी चर्चा करण्यात येणार आहे.नागपुर महानगर पालिकेच्या माजी महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती व नगरसेविका प्रगती पाटील या सुध्दा स्नेहमीलनाचा कार्यक्रमाला उपस्थित होत्या‌ व प्रतिष्ठांना तर्फे नागरिकांच्या हितार्थ उपक्रमाबद्दल पुर्ण सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

याप्रसंगी प्रतिष्ठानाचे सचिव राजेश कुभंलकर,,उपाध्यक्ष रवि गाडगे पाटील,हरविदंर सिंग मुल्ला,पराग नागपूरे, नितीन गेडाम, सुरेन्द्र रामटेके,तनुज चौबे,अल्ताफ अंसारी,राजु अस्वले, विठ्ठल ढेंगरे,,मनोज मालवीय,शालिकराम चरडे प्रामुख्याने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here