शहापूर मध्ये धर्मगुरू फुलनाथ बाबा यांच्या प्रमुख उपस्थितीत लोक हिंद गौरव सोहळा संपन्न…

धीरज घोलप

ठाणे जिल्हा ग्रामीण पत्रकार संघाच्या वर्धापन दिनानिमित्त ,साप्ताहिक शिवमार्ग व लोक हिंद वृत्तवाहिनी तर्फे दरवर्षी राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना मागील तीन वर्षांपासून राज्यस्तरीय लोक हिंद गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येत असून सन २०२० -२१ चा लोक हिंद गौरव पुरस्कार नुकताच शहापूर येथे धर्मगुरू फुलनाथ महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचंड उत्साहात आणि भव्य दिव्य स्वरूपात संपन्न झाला.

लोक हिंद चॅनेल व पत्रकार महेश धानके यांचे सर्वच क्षेत्रातील काम उल्लेखनीय आहे,गेली ४ वर्षांपासून सातत्याने इतका भव्य दिव्य राज्यस्तरीय सोहळा करणे यावरून त्यांची लोकप्रियता सिद्ध होत असून त्यांच्या हातून असेल कार्यक्रम होतील असा आशीर्वाद धर्मगुरू फुलनाथ महाराज यांनी मनोगतातून दिला, कार्यक्रमास धर्मगुरू फुलनाथ महाराज,श्री क्षेत्र टाकेश्वर, सुभाष पवार,उपाध्यक्ष ठाणे जिल्हा परिषद,दशरथ तिवरे,माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद ठाणे,

शंकर खाडे,संपादक रान भरारी,संजय निमसे,सभापती कृषी व पशुसंवर्धन, जि प ठाणे,सौ रत्नप्रभा तारमळे,सभापती महिला व बालकल्याण जि प ठाणे,दयानंद चोरघे,अध्यक्ष डी वाय फाउंडेशन, आनंद भागवत,संस्थापक वसुंधरा संजीवनी मंडळ, डॉ दिलीप धानके,अध्यक्ष जनक्रांती महाराष्ट्र, किशोर कुडव,अध्यक्ष ज्ञानवर्धिनी शिक्षण संस्था,निलेश भांडे,सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती,शेखर अधिकारी,सभापती शहापूर तालुका खरेदी विक्री संघ,

राजाभाऊ पातकर, उद्योजक,भास्कर वडवले, उद्योजक,सुभाष पवार,उद्योजक नवी मुंबई,कुणबी समाज नेते शांताराम बांगर,उपसभापती जगन पष्टे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ तरुलता धानके,सामाजीक नेत्या अपर्णा खाडे, विद्याताई वेखंडे,अविनाश थोरात,

सेवा निवृत्त विस्तार अधिकारी यादव धानके,अनंत शेलार,काशीनाथ तिवरे,दाजी भोईर,चेतन पवार,सुमेध भवार,विजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी विजय देसले यांच्या पाऊलखुणा या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले तर शिवमार्ग वेबसाईट व पोर्टल चे फुलनाथ महाराज यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले,

कार्यक्रमाचे प्रास्तविक संपादक महेश धानके यांनी केले.लोक हिंद गौरव पुरस्कार ज्यांना ज्यांना देण्यात आले आहेत त्यात श्री क्षेत्र टाकेश्वर – संत गाडगेबाबा स्मृती धर्मसेवा  लोक हिंद गौरव, डी वाय फाउंडेशन – राजीव गांधी स्मृती सेवाभावी संस्था लोक हिंद गौरव, पांडुरंग बरोरा (माजी आमदार) – साबीरभाई शेख स्मृती लक्षवेधी नेता लोक हिंद गौरव, मोनिका ताई पानवे – ताराराणी स्मृती रणरागिणी लोक हिंद गौरव, विजय बाळाराम पाटील – दि बा पाटील स्मृती ज्ञातीसेवा लोक हिंद गौरव,

रश्मीताई रविकांत निमसे – रमाबाई रानडे स्मृती स्त्री सन्मान लोक हिंद गौरव, विजय सदाशिव घोगरे – गो रा खैरनार स्मृती प्रशासन क्रांती लोक हिंद गौरव, कु.प्रियांका अशोक विशे – इंदिरा गांधी स्मृती प्रशासन प्रेरणा लोक हिंद गौरव, गणपत विशे – शामराव पेजे स्मृती समाजसंघटक लोक हिंद गौरव, हभप गुरुराज इमानदार – नरेंद्र दाभोळकर स्मृती समाजसुधारक लोक हिंद गौरव, आशुतोष लक्ष्मण घरत – बाळासाहेब माटे स्मृती उद्योजक प्रेरणा लोक हिंद गौरव,

सुमेध भवार – डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मृती जननायक लोक हिंद गौरव, डॉ गजानन पाटील – डॉ नितु मांडके स्मृती आरोग्य सेवा लोक हिंद गौरव, दर्शन विजय ठाकूर – संत तुकाराम महाराज स्मृती वनसंवर्धन लोक हिंद गौरव, डॉ कल्पेश तारमळे – डॉ भाऊ लाड स्मृती आरोग्य सेवा लोक हिंद गौरव, संग्राम तोगरे पाटील – नाना शंकर शेठ स्मृती जनसेवा लोक हिंद गौरव, प्रकाश म्हात्रे – स्वामी स्वरूपानंद  स्मृती अध्यात्म सेवा लोक हिंद गौरव, विजय पाटील – बाबा आमटे स्मृती आरोग्यदूत लोक हिंद गौरव,

दशरथ हरड – स्व विठ्ठलराव खाडे स्मृती लोक सेवा लोक हिंद गौरव, अल्पेश भोपी – म फुले स्मृती समाज रत्न लोक हिंद गौरव, एकनाथ देसले – विजय तेंडुलकर स्मृती नाट्यप्रेरणा लोक हिंद गौरव, सुनील साठे – आनंद दिघे स्मृती लक्षवेधी युवा नेता, प्रा गोपाळ वेखंडे – कवी शंकर बडे स्मृती साहित्यसेवा लोक हिंद गौरव, सुजाता पाटणकर – गजानन बुवा पाटील स्मृती भजन रत्न लोक हिंद गौरव, गोविंद धिर्डे – स्वातंत्र्य सैनिक किसनबाबा भेरे स्मृती ज्ञातीसेवा लोक हिंद गौरव,

अविनाश कटकवार – राजीव गांधी स्मृती लक्षवेधी प्रशासक लोक हिंद गौरव, सुधीर भोईर – साने गुरुजी स्मृती प्रयोगशील शिक्षक लोक हिंद गौरव, गुरुनाथ सांबरे – शांतारामभाऊ घोलप स्मृती कृषी रत्न लोक हिंद गौरव, सारिका शिंदे – तानुबाई बिर्जे स्मृती लक्षवेधी पत्रकारिता लोक हिंद गौरव,दीपक कडव – डॉ दत्ता सामंत स्मृती उद्योजक प्रेरणा लोक हिंद गौरव, संतोष निचिते – राजर्षी शाहू महाराज स्मृती शिक्षण सेवा लोक हिंद गौरव,

निलेश पाटील – शहिद  भगतसिंग स्मृती देशसेवा लोक हिंद गौरव, नीलकंठ व्यापारी – स्व अब्दुल कलाम स्मृती शिक्षक प्रेरणा लोक हिंद गौरव, राजू शांताराम पाटील – क्रांतिसिंह नाना पाटील स्मृती उत्कृष्ट रक्षक लोक हिंद गौरव, हरिश्चंद्र तुकाराम भोईर – डॉ पंजाबराव देशमुख स्मृती गुणवंत शिक्षक लोक हिंद गौरव, दिलीप गणपत कराळे – अण्णासाहेब पाटील स्मृती कामगार सेवा लोक हिंद गौरव, तुकाराम बांगर – शहीद हेमंत करकरे स्मृती शौर्य प्रेरणा लोक हिंद गौरव,

अशोक धर्मा घोलप – प पू रिद्धीनाथबाबा स्मृती गुणवंत वारकरी लोक हिंद गौरव, विलास गगे – स्व सोनुभाऊ बसवंत स्मृती समाज रत्न लोक हिंद गौरव, रवींद्र पष्टे – कर्मवीर भाऊराव पाटील स्मृती लक्षवेधी शिक्षक लोक हिंद गौरव, भगवान मोकाशी – स्व पा शि देशमुख स्मृती कृतिशील लोकप्रतिनिधी लोक हिंद गौरव, अशोक वीर – भाई भोपतराव स्मृती लक्षवेधी सरपंच लोक हिंद गौरव, प्रभाकर थोरात – शाहीर वामनदादा कर्डक स्मृती संविधान जागर लोक हिंद गौरव,

अपर्णा देवेन्द्र भेरे – सावित्रीबाई फुले स्मृती ज्ञानज्योती लोक हिंद गौरव,भरत दळवी – संत तुकडोजी महाराज स्मृती युवा प्रबोधनकार लोक हिंद गौरव,जनसेवा एकात्मिक संस्था – बिरसा मुंडा  स्मृती आदिवासी प्रेरणा लोक हिंद गौरव, प्रदीप मोगरे – बाबा आमटे स्मृती रुग्णमित्र लोक हिंद गौरव, विजय सूर्यवंशी – लोककवी अण्णाभाऊ साठे स्मृती लक्षवेधी साहित्यिक लोक हिंद गौरव, राजकुमार कडव – महर्षी कर्वे स्मृती शिक्षक रत्न लोक हिंद गौरव,

खंडूजी मारुती चौधरी – शंकरराव झुंजारराव स्मृती लक्षवेधी उद्योजक लोक हिंद गौरव, विनायक मुरेकर – पुंडलिकराव लहाने स्मृती आरोग्य रक्षक लोक हिंद गौरव ,प्रमोद भेरे,स्व विलासराव देशमुख गुणवंत कर्मचारी लोक हिंद गौरव यांचा समावेश आहे,

यावेळी जेष्ठ नेते दशरथ तिवरे याना जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला तर शहापूर तालुक्यातील तरुणी जयश्री प्रकाश वीर हिची सैनिक म्हणून निवड झाल्याबद्दल तिचा विशेष सन्मान करण्यात आला,तसेच करा ओके स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त श्रद्धा पवार हिचाही सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश शिंदे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यकारी संपादक लक्ष्मण घरत व निवड समिती प्रमुख किसन बोन्द्रे,सहसंपादक जगदीश पताळे, उपसंपादक अंकुश भोईर,अरविंद निपुरते यांच्यासह पत्रकार रवींद्र जाधव,सुनील महाजन,संजय सूर्यवंशी, नवज्योत पिंगळे, तेजस रोकडे,वैशाली घरत,धनश्री पाठारी,

मीनाक्षी भला,जयेश चौधरी, दीपक आरज,कल्पेश कोर,कांतीलाल वरकुटे,कैलास मुकणे,महेंद्र आरज,जगदीश भोईर, जयवंत ढमके,लक्ष्मण पवार,रोहिणी जाधव,संतोष ठाकरे,आशुतोष घरत,ऋषिकेश धानके,सिद्धार्थ धानके,गणेश वाघ,निवड समितीचे डॉ योगेश भानुशाली,धनंजय धसाडे,नवनाथ पवार यांनी विशेष परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here