लोहारा मन नदी चा पूल वाहनांसाठी झाला धोकादायक शेगाव – अकोट राज्यमार्गावर पुन्हा ट्रक फसला…

अकोला – अमोल साबळे

बाळापूर तालुक्यातील आणि अकोला जिल्ह्याच्या सीमेवरील शेगाव – अकोट राज्यमार्गावरील लोहारा गावाजवळ असलेल्या मन नदीच्या पुलावर इंग्रजकालीन पूल बांधलेले आहे. याठिकाणी दोन दिवसापूर्वी पुलाचा काही भाग खचला होता.

यात कोंबड्या घेऊन जाणारे वाहन पुलात लटकले होते यावेळी यात सुदैवाने जीवित हानी झाली नव्हती. या ठिकाणी संबंधित कंत्राटदाराने थातुर मातुर माती व मुरूम टाकून सदर मार्गावरून वाहतूक सुरू केली होती मात्र आज सकाळीच पुन्हा याच ठिकाणी आज पहाटे ३ च्या सुमारास साखर घेऊन अकोट कडे जाणारा एम एच 30 ए बी 4099 हा मालवाहू ट्रक फसला आहे.

यामुळे अकोट शेगाव या राज्य मार्गावरील वाहतूक पुन्हा ठप्प पडली होती. कवठा बॅरेज मुळे बाजूलाच नवीन पुलाचे बांधकाम केल्या जात असून कंत्राटदाराने जुन्या पुला जवळ खोदकाम केल्यामुळे हा येथे अपघात घडत आहेत. या घटनेला दोन दिवसाचा अवधी उलटला तरी सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे चित्र आहे.

सदर मार्ग सध्या वाहनचालकां साठी धोकादायक झाले आहे. माहिती मिळताच उरळ ठाण्याचे ठाणेदार अनंतराव वडतकर बिट जमादार राजा बचे जयेश शिंगरे यांनी जेसीबी व गावकर्यांच्या साह्याने फसलेला ट्रक बाहेर काढले व सात तास नंतर वाहतूक सुरु केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here