नागपुरात १५ ते २१ पर्यंत लॉकडाऊन…डॉ.नितीन राऊत पालकमंत्री

नागपूर – शरद नागदेवे

नागपूरात ‌कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत असून ही स्थिती आटोक्यात आणण्यासाठी नागपुरात १५ ते २१ मार्चपर्यंत लॉकडाऊन राहणार असल्याचीची घोषणा नागपूरचे पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी केली.२३ ते ७ मार्चपर्यंत नागपुरात मीनी लॉकडाऊन करण्यात आला होता.

शनिवार व रविवार रोजी बाजारपेठ बंद ठेवण्याचे आदेश नितीन राऊत यांनी मागे केली होती.यानंतर १४ मार्चपर्यंत पुन्हा निर्बंध वाढविण्यात आले होते.नागपूरातील झालेल्या भयावह स्थितीमुळे महत्वाची बैठक पालकमंत्री नितीन राऊत यांनी घेतली.

याबैठकीला विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी,मनपा आयुक्त, मेयो, मेडीकल रुग्णालयाच्या अधिष्ठाता आणि आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.यानंतर शहरात लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला.

शहरात कोरोनाबाधितांची संख्येत वाढ होत असल्याने शहरात १५ ते २१ मार्चपर्यंत शहरात लॉकडाऊन घोषीत करण्यात आला.या दरम्यान विनाकारण नागरिक रस्त्यावर फिरतांना दिसल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे.यामुळे पोलीसांना कडक संचारबंदीचे आदेश देण्यात आले आहे.

काय सुरू असणार व बंद…

*अत्यावश्यक सेवा

*भाजीपाल्याची दुकाने सुरू राहतील.

  • बॅंक पोस्ट अॉफीस सुरू राहतील

*डोळे रुग्णालय व चष्म्याची दुकाने सुरू राहतील.

  • खाजगी कार्यालय बंद.

*उद्योग सुरू राहतील.

*सरकारी कार्यालयात २५% उपस्थिती.

*दारू दुकाने बंद अॉनलाईन सुरू.

  • खाद्य पदार्थ घरपोच राहतील.

*लसीकरण सुरू राहील.

*लोक प्रतिनिधींची जाण्या येण्याची सोय करावी.

*२१ पुर्वी पुन्हा बैठक.

*आमदार निवास विलगीकरण केंद्र.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here