वाढवण बंदर उभारणीच्या हालचालींना वेग,जेएनपिटी च्या अधिकाऱ्याना स्थानिकांनी खडसावले…

डहाणू तालुक्याच्या समुद्र किनाऱ्यावरील प्रास्तवित वाढवण बंदराला स्थानिकांचा विरोध कायम.

पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यात प्रस्तावित वाढवण बंदर उभारणीच्या सर्वेक्षणाची तयारी करण्यासाठी जेएनपीटीचे अधिकारी बुधवारी (ता.16)पाहणी दौऱ्यावर आले होते. यावेळी वाढवण बंदराचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने स्थानिक नागरिकांनी जेएनपिटीच्या अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावत बंदराला ठाम विरोध असल्याचे सांगितले.

बुधवारी वाढवण बंदराच्या ठिकाणी जेएनपीटी चे चेअरमन संजय सेठी,जिल्हाधिकारी डॉ माणिक गुरसळ,पोलीस अधीक्षक शिंदे आणि डहाणूचे तहसीलदार राहुल सारंग पोलिस बंदोबस्तात वाढवणच्या समुद्र किनाऱ्यावर पोहोचले होते.

याबाबत माहिती मिळताच वाढवण च्या समुद्र किनाऱ्यावर मोठ्या संख्येने स्थानिक ग्रामस्थ एकत्र येऊन विरोध दर्शवला.वाढवण बंदराचे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. तसेच डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाने बंदराच्या सर्वेक्षणाच्या कामाला बंदी घातलेली असताना, बंदराच्या सर्वेक्षणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

परंतु बंदर उभारणीचे काम कायदेशीर प्रक्रिया आणि आवश्यक परवानग्या घेतल्या जातील. तसेच जनसुनावणी घेतल्यानंतरच सुरू करण्यात येणार असल्याचे जेएनपीटी चे व्यवस्थापकिय संचालक संजय सेठी यांनी यावेळी सांगितले.तसेच कायदेशीर बाबी ग्रामस्थांनी नोंदवाव्यात असेही सांगितले.

केंद्र सरकारकडून पर्यावरणाची राखरांगोळी करणारे प्रकल्प विना अडथळा आणि बिनदिक्कतपणे राबविण्यासाठी अस्तित्वात असलेला पर्यावरण विषयक कायदा मोडीत काढला जात आहे.उद्योग उभारणीस कोणतीही न परवानगी घेता,पर्यावरण विषयक जनसुनावणीची तरतूद नसलेला,पर्यावरण परिणाम मूल्यांकन मसुदा 2020 आणला आहे.

कायदा अस्तित्वात येण्या लआधी स्थानिक शेतकरी, मच्छिमार,बागायतदार,डायमेकर्स यांना उदध्वस्त करणाऱ्या वाढवण बंदर उभारणीच्या हालचालींना वेग आला आहे.त्यादृष्टीने जेएनपीटी च्या अधिकाऱ्यांच्या पाहणी दौऱ्याकडे पाहिले जात आहे.पपाहणी दौऱ्यावर आलेल्या जेएनपीटी च्या अधिकाऱ्यांना विरोध दर्शवून येत्या काळात वाढवण बंदराच्या विरोधाची धार वाढणार असल्याने संकेत स्थानिकांनी दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here