अकोल्यात बनावट चलनी नोटा बाळगणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेकडुन पर्दाफाश…

अकोला – आज दिनांक ११.११.२०२० रोजी स्थानिक गुन्हे शाखेस गोपनिय बातमीदाराकडुन खात्रीलायक माहिती मिळाली की, एक इसम हा अकोट फैल परीसरातील मच्छी मार्केट मध्ये बनावट चलनी नोटा चालविण्याचा प्रयत्न करीत आहे.

वरुन स्थानिक गुन्हे शाखचे पोलीस निरीक्षक श्री शैलेश सपकाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि सागर हटवार यांचे तपास पथकाने अकोट फैल परीसरातील मच्छी मार्केट मध्ये सापळा रचुन आरोपी नामे अबरार खान हयात खान वय २७ वर्ष रा. नायगांव, अकोट फैल यास ५००/-३ छापील किंमतीच्या बनावट चलनी नोटा बाळगुन त्या परिसरातील दुकानात चालविण्याचा प्रयत्न करीत असतांना,

ताब्यात घेवुन त्याचे अंगझडतीमधुन ५००/- रु छापील किंमतीच्या एकच क्रमांक नमुद असलेल्या ०३ बनावट चलनी नोटा एकुण दर्शनी किंमत १५००/- रु च्या जप्त करण्यात आल्या तसेच त्याचे नायगांव,अकोट फैल येथील राहते घराची घरझडती घेवुन ५००/- रु छापील किंमतीच्या ५४ बनावट चलनी नोटा एकुण दर्शनी किंमत २७,०००/- रु च्या जप्त करण्यात आल्या.

आरोपी अबरार खान हयात खान यास प्राथमिक विचारपुस केली असता त्याने सदर नोटा हया त्याचे जानोरी, शेगांव, जि. बुलडाणा येथील साळा नामे शेख राजिक शेख चांद याचेजवळुन आणल्याचे सांगितले.

वरुन ग्राम जानोरी, ता. शेगांव, जि. बुलडाणा येथे जावुन शेख राजिक शेख चांद यास ताब्यात घेवुन त्याचे घरझडती मधुन ५००/- रु छापील किंमतीच्या एकच क्रमांक नमुद असलेल्या २२ बनावट चलनी नोटा एकुण दर्शनी किंमत ११,०००/- रु च्या जप्त करण्यात आल्या आहेत.

शेख राजिक शेख चांद, रा. जानोरी, ता. शेगांव, जि. बुलडाणा यास प्राथमिक विचारपुस केली असता त्याने सांगितले की, त्याने शेगांव येथील राहणा-या एका इसमाकडुन २५,०००/- रु चलनी नोटा देवुन ५००/- रु छापील किंमतीच्या ७९ बनावट चलनी नोटा एकुण दर्शनी किंमत ३९.५००/- रु च्या घेतल्या होत्या.

याप्रमाणे आरोपी अबरार खान हयात खान आणि शेख राजिक शेख चांद या दोघांना ताब्यात घेवुन त्यांचेकडुन ५००/- रु छापील किंमतीच्या ७९ बनावट चलनी नोटा एकुण दर्शनी किंमत ३९.५००/- रु च्या पंचांसमक्ष जप्त करण्यात आल्या आहेत. दोन्ही आरोपी तथा जप्त बनावट चलनी नोटा पुढील तपासकामी पो स्टे अकोट फैल यांचे ताब्यात देण्यात येत आहे.

सदरची कार्यवाही ही मा. पोलीस अधिक्षक्षक सा.श्री जी. श्रीधर, मा. अपर पोलीस अधीक्षक सा. श्रीमती मोनिका राउत यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. शैलेश सपकाळ, पोउपनि. सागर हटवार, सपोउपनि राजपालसिंह ठाकुर, पोहेकॉ. सदाशीव सुळकर, गणेश पांडे, पोकॉ रवि इरच्छे, अब्दुल माजिद, इजाज अहेमद, मो. रफी, गोपाल पाटील, चालक पोशि. अविनाश मावळे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here