स्वयंम सहाय्यता गटाला २३ लाखाचे कर्ज वाटप…

अहमदपूर – बालाजी तोरणे

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवान्नोती अभियाना अंर्तगत व बँक ऑफ महाराष्ट्राच्या 86 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून बॅक ऑफ महाराष्ट्र शाखा हडोळती शाखेत बॅक मॅनेजर म्हणून नव्यानेच रुजु झालेले मनोज वाघमारे यांच्या हस्ते कर्ज वाटप स्वंयम सहाय्यता गटाला 23 लाखाचे कर्ज वाटप करण्यात आले त्यामूळे त्यांच्या या कार्याबद्दल स्तुती सुमने व प्रशंसा होत आहे.

सविस्तर माहीती अशी की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महीलांना रोजगाराचे साधन उपलब्ध नाही बचत गट तथा स्वंयम सहाय्यता गटाच्या माध्यमातून महिलांना रोजगार मनोज उपलब्ध व्हावा या हेतूने सरकारने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवान्नोती अभियाना अंर्तगत बँकेमार्फत अल्प दराने व्याज आकारले जाते त्यामूळे महीलाना स्वतःच्या पायावर सक्षम बनविण्याचा शासन प्रयत्नशील आहे.

गरजवंत बचत गटाना कर्जवाटपासाठी महाराष्ट्र बँक तत्पर असल्याची माहीती बँक मॅनेजर वाघमारे यांनी दिली.बऱ्याच महीला कांहीतरी व्यवसाय करण्यासाठी इच्छूक आहेत पण जवळ भांडवल नसल्यामुळे व्यवसाय करू शकत नाहीत त्यामूळे या ग्रामीण भागातील महिलांना हाताला रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी सरकारने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवान्नोती अभियानाच्या माध्यमातून महीलांना बँकेने कर्ज उपलब्ध करुन देऊन सक्षम बनविण्याचा प्रयत्न केला आहे.

या योजनेच्या माध्यमातून जळकोट तालुक्यातील हावरगा, शेलदरा, उमरगा ( रेतू) ,येलदरा या गावातील आठ गटांना नऊ लाख व अहमदपुर तालुक्यातील हडोळती, वळसंगी, हीप्पळगाव , तीर्थ या गावातील ११ समूहाला १४ लाख बॅक ऑफ महाराष्ट्र हडोळती शाखेने असे एकूण २३ लाखाचे कर्ज वाटप केले.

बँक ऑफ महाराष्ट्र शाखा हडोळती येथील शाखेमध्ये गटांना कर्ज वाटप करताना शाखा व्यवस्थापक मनोज गोविंद वाघमारे, सहाय्यक व्यवस्थापक चैतन्य कुमार कोटा , सहाय्यक शिवाजी कोळी , भास्कर केंद्रे, बँक सखी प्रिती पवार स्वयंमसहाय्यता गटाच्या दोन्ही तालुक्यातील महीला उपस्थीत होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here