नांदेड जिल्ह्यात शुक्रवारी दारु विक्री बंद…

नांदेड – महेंद्र गायकवाड

नांदेड जिल्ह्यात शुक्रवार 19 फेब्रुवारी 2021 रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्सव साजरा होणार आहे. या दरम्यान जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था रहावी आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन अनुचित प्रकार घडू नये

यासाठी शुक्रवार 19 फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील दारु विक्रीचे व्यवहार पुर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमीत केले आहेत.

मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी 19 फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील सर्व सीएल-3, एफएल-3, एफएल-2, एफएल/बिआर-2 व ताडी विक्रीच्या अनुज्ञप्त्याचे अंतर्गत व्यवहार पुर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

या आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाविरुद्ध दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल, असेही आदेशात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here