न्यूज डेस्क – राज्यात मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणावरून सुरु झालेल्या निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेंची सध्या NIA तर्फे चौकशी सुरू आहे. तर कोर्टापुढे वाझेंनी सादर केलेल्या जबाबामधून आतापर्यंतच्या सर्वात धक्कादायक गोष्टी पुढे आल्या आहेत.
वाझेंनाी कोर्टापुढे हस्तलिखित पत्र सादर केलं. त्यात तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांनी आपल्याकडे 2 कोटींची मागणी केल्याचं वाझेनी सांगितलं आहे. त्याबरोबरच आणखी एका शिवसेना मंत्र्याचं नावही या जबाबात वाझेंनी घेतल्याने खळबळ उडाली आहे.
‘निलंबन टाळायचं असेल तर दोन कोटी द्या’, अशी मागणी गृहमंत्री अनिल देशमुखांनी आपल्याकडे केल्याचं वाझे यांनी म्हटलं आहे. ‘आपल्याला एवढी मोठी रक्कम देता येणार नसल्याचं सांगितलं. त्याबरोबरच अनिल देशमुखांनी प्रत्येक बारमधून साडेतीन लाख वसूल करून आणा’, असंही सांगितल्याचं सचिन वाझेनी नमूद केलं आहे.
वाझेंच्या या पत्रात उपमुख्यमंत्र्यांचाही नावाचा उल्लेख आहे. वाझेंच्या जबाबामध्ये शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांचंही नाव आहे. अनिल परब यांनीही आपल्याला खंडणी वसून करायला सांगितलं, असा खळबळजनक आरोप वाझेंनी कोर्टापुढे सादर केलेल्या पत्रातून केला आहे.
तर अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत सर्व आरोप फेटाळून लावले असून, यासाठी मी कुठल्याही चौकशीला जाण्यास तयार आहे…सोबतच स्वतः नार्को टेस्ट करायला तयार असल्याचे अनिल परब यांनी पत्रकार परिषेदत माहिती दिली.