नववधूला सोडून नवरदेव पळाला, लग्नाच्या वरातीत झाला राडा…

महाव्हॉईस न्युज – निलेश जाधव

बिहारमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. लग्नाच्या वरातीत वरपक्ष आणि गावकऱ्यांमध्ये जबरदस्त राडा झाला. त्यात नवरदेवाचा भाऊ, भाच्यासह अन्य दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. त्यामुळे संतापलेला नवरदेव नववधूला टाकून पळून गेला.

ही घटना बिहारच्या गोपालगंज गावातील आहे. नवरदेवाचे नाव सुनील बासफोर असे आहे. त्याच्या म्हणण्यानुसार डीजेवर डान्स करत असताना हे भांडण झाले होते. यामध्ये भाऊ आणि भाच्याला गावकऱ्यांनी प्रचंड मारलं. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार त्यानंतर भांडण मिटवण्यासाठी मध्यस्थी केली असता नवरदेवाकडील मंडळींनी कोणाचेच न ऐकता वरात परत घेऊन गेले. 

या वरातीत शंकर बासफोर यांचा मुलगा अजय बासफोर आणि नगीना बासफोर यांचा मुलगा अनिल बासफोर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. जखमी झालेले अनिल बासफोर यांनी सांगितले की, डिजे बंद झाल्याने गावातील 20 ते 25 गावकऱ्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. यावेळी तिथे असलेल्या खुर्ची, टेबलांची तोडफोड केली. गावातील ही लोकं कोणाचेही काही ऐकायला तयार नव्हते.

या घटनेमुळे नववधूच्या आईचा प्रचंड धक्का बसला. लग्नात एवढा मोठा व्यत्यय आल्याने ती दु:खी झाली आहे. वरपक्षाचे जोरदार स्वागत केले. लग्न झाले त्यानंतर लग्नाच्या वरातीत हे भांडण झाले. यात मुलीचा काहीच दोष नव्हता. मात्र भांडणानंतर मुलीला टाकून नवरदेवासह वरपक्ष पळून गेला.

याप्रकरणी वधू आणि वर दोन्ही पक्षाकडून कोणीच पोलीस स्थानकात तक्रार दिलेली नाही. अखेर हे प्रकरण पंचायतीपर्यंत पोहोचले. त्यानंतर गावातील लोकप्रतिनीधींनी मध्यस्थी करून नवरदेवाला नववधूला घरी नेण्यास भाग पाडले. त्यामुळे लग्नाच्या दुसऱ्या दिवशी नवरदेव नववधूला घेऊन त्याच्या घरी परतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here