आत्म निर्भर होण्यासाठी शिका – डॉ सुचिता पाटेकर…

अकोट – आत्म निर्भर होण्यासाठी शिक्षण घेणे महत्वाचे आहे, कोणतेही काम,ज्या मधून प्रामाणिक पणे अर्थार्जन करता येते, ते वाईट नाही. विद्यार्थ्यांनी विशेषतः मुलींनी आत्मनिर्भर व्हावे, प्रमाणिक पणे शिकावे, पालकांना हातभार लावावा असे कळकळीचे आवाहन शिक्षणाधिकारी डॉ सुचिता पाटेकर यांनी केले.

स्थानिक श्रीमती लक्ष्मीबाई गणगणे विद्यालयात आयोजीत कार्यक्रमात डॉ पाटेकर बोलत होत्या. संस्थेचे अध्यक्ष गजानन गणगणे कार्यक्रमा च्या अध्यक्षस्थानी होते, तेल्हारा गट शिक्षणाधिकारी प्रदीप चोरे, नायब तहसीलदार हरिष गुरव, स्पर्धा परीक्षा यु ट्यूब चॅनेल चे प्रणेते डॉ रविंद्र भास्कर, विभागीय परीक्षा मंडळाचे माजी सदस्य विलास रोडे, संस्थेच्या संचालिका अर्चना गणगणे, मुख्यध्यापक समाधान धर्मे, मुख्याध्यापक संजीवकुमार गाडगे, माजी मुख्याध्यापिका डॉ रेखा जुनगरे-रोडे व्यासपीठावर हजर होते.

डॉ पाटेकर पुढे म्हणालात की, विद्यार्थ्यांना विविध प्रश्न पडले पाहिजेत व त्यांनी त्यांची उत्तरे शोधून काढावीत. त्या साठी शिक्षक वर्गाची मदत घ्यावी, पुस्तके वाचावीत, चर्चा करावी. प्रयोगातून मिळालेले ज्ञान चिरस्थायी असते, शिक्षक वर्गाला देखील त्यांनी प्रोत्साहन पर मार्गदर्शन केले.गटशिक्षणाधिकारी प्रदीप चोरे यांनी देखील समयोचित मार्गदर्शन केले.

नायब तहसीलदार हरिष गुरव यांनी डॉ पाटेकर यांच्या कार्यकाळात शैक्षणिक क्रांती होईल, अकोला जिल्ह्यातील विद्यार्थी देशात चमकतील असा सार्थ विश्वास व्यक्त केला.
या प्रसंगी शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविणाऱ्या विदयार्थी व त्यांच्या शिक्षक वर्गाचा मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला. शैक्षणिक क्षेत्रात नवीन उपक्रम राबविण्या साठी डॉ पाटेकर यांना राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला, त्या बद्दल डॉ पाटेकर यांच्या गणगणे शैक्षणिक संकुला तर्फे सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमचे प्रास्ताविक विलास रोडे यांनी, संचालन अनघा सोनखासकर यांनी केले तर अरविंद लहाने यांनी आभार मानलेत. कार्यक्रमाला विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी मोठया संख्येने हजर होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here