बंजारा समाजाचे नेते, माजी राज्यमंत्री मखराम पवार यांचे निधन…

माजी कॅबिनेट मंत्री तथा गोर बंजारा समाजाचे नेते मखराम पवार यांचे आज मुंबईतील लीलावती रुग्णालय निधन झाले. आज सकाळच्या दरम्यान त्यांची प्राण ज्योत मावळली, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते.

बार्शीटाकळी तालुक्यातील लोहगड हे त्याचं मुळगाव असून ते गेल्या अनेक वर्षापासून नोकरी निमित्य मुंबई स्थाईक होते. त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाला 1990 मध्ये सुरुवात करीत करीत मुर्तीजापुर विधानसभा मतदार संघातून प्रथम निवडून आले होते, त्यांनी भाजपचे मोतीराम लहाने यांचा पराभव करीत इतिहास घडविला होता.

त्यावेळी भारीप बहुजन महासंघाचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांची त्यांना साथ होती. त्यानंतर 2013 मध्ये त्यांनी अकोल्यात स्वराज्य भवनसमोरील मैदानात झालेल्या जाहीर सभेमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

त्यांच्या अचानक जाण्याने बंजारा समाजाची मोठी हानी झाली. आज त्यांना मुंबईवरून त्यांच्या मुळगावी लोहगड येथे आणणार असून तेथेच त्यांचावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here