डहाणू येथील सहाय्यक जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांनी मास्क वापरा मोहीम राबवली…

डहाणू – जितेंद्र पाटील

सहाय्यक जिल्हाधिकारी डहाणू अशिमा मित्तल यांनी कोविड -19 या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी मास्क घालणे अनिवार्य असल्याबाबत डहाणू नगरपालिका क्षेत्रामध्ये जनजागृती मोहीम हाती घेतली आहे.गेल्या महिन्याभरात कोरोना च्या रुग्णात वाढ होत असल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोकांना मास्क वापरणे बंधन कारक आहे.

दुकानें, रिक्षाचालक, बाईकस्वार, मत्स्यव्यावसायिक, हॉटेल्स, सगळ्यांना मास्क वापरण्याची ताकीद दिली.सदर मोहिमेमध्ये डहाणू नगरपरिषदेचे ऑफिसर पिंपळे, तहसीलदार डहाणू राहुल सारंग तसेच पोलिस स्टेशनचे अधिकारी राहुल पाटील हे हजर होते.

सदर पथकाने गांधीगिरी करत मास्क न घालणारी इसम आहेत, त्यांना गुलाबाचे फुल व मास्क हे भेट वस्तू म्हणून दिल्या. तसेच ताकीदही दिली आहे की, पुढच्या वेळेस जर पकडले गेले तर फाईन वसूल केला जाईल.तसेच अनेक दुकानदारांकडून फाईन वसूल करण्यात आलेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here