डेल्हीवरीद्वारे ‘डेल्हीवरी डायरेक्ट’ची सुरुवात…

ग्राहकांना घरबसल्या पार्सल पाठवण्यास सक्षम करते…

मुंबई भारतातील आघाडीची सप्लाय चैन सेवा प्रदाता डेलीव्हरीने आपली उपभोक्ता-ते-उपभोक्ता एक्सप्रेस पार्सल सेवा लॉन्च केल्याचे सांगितले आहे. हे नवीन उत्पादन लोकांना त्यांच्या घरी बसल्या बसल्या भारतातील १९०००+ पिनकोड वर आणि २५००+ शहरात राहणा-या आपल्या मित्रांना किंवा नातेवाईकांना पार्सल पाठवण्यास सक्षम करते.

ग्राहक आता डायरेक्ट.डेल्हीवरी.कॉमवर सहजपणे पार्सल ऑनलाइन बुक करू शकतात. ह्या घरबसल्या मिळणा-या पिकअप सेवेत सुरक्षा व स्वच्छतेच्या सगळ्या नियमांचे देखील संपूर्ण पालन होते. शिवाय त्यासोबत डिलिव्हरी होईपर्यंत रियल टाइम पार्सल ट्रॅकिंगची देखील सुविधा आहे.

डेल्हीवरी विक्री विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष रोहन शानबाग म्हणाले “आम्ही आता आमची सेवा शहरात अंतर्गत आणि देशभरात राहणा-या व्यक्तींसाठी सहज उपलब्ध करून देत आहोत. आत्तापर्यंत ही सेवा पारंपरिक पद्धतीने चालत आलेली आहे. त्यात इनोव्हेशन द्वारे टेक्नॉलॉजी आधारित ऑनलाइन

बुकिंग सुविधा तुम्हाला घरबसल्या मिळवून देण्याचा आमचा उद्देश आहे. धोरणात्मक दृष्ट्या, हा आमच्या व्यापक आणि देशभरातील सत्वर नेटवर्कचा एक स्वाभाविक विस्तार आहे आणि या इनोव्हेशनमुळे व्यवसाय आणि व्यक्तींसाठी एक पसंतीची सेवा प्रदाता म्हणून आमचे स्थान आणखीन बळकट होण्यास मदत होईल.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here