रामटेक पं.स. मध्ये “कोप शॉप” चा शुभारंभ उमेद अंतर्गत महिला साक्षमीकरनासाठी उचलले पाऊल…

बि.डी.ओ. बमनोटे यांचे हस्ते उद्घाटन…

रामटेक – राजु कापसे

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनन्ंनोती अभियान अंतर्गत महिला सक्षमीकरण अभियानाच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम तालुक्यात सुरू आहेत. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनन्ंनोती अभियान (उमेद) योजने अंतर्गत रामटेक पंचायत समितीच्या पटांगनात महिला बचत गटांच्या “कोप शॉप” चा शुभारंभ बि.डी.ओ. प्रदीप बमनोटे यांचे हस्ते करण्यात आला.

त्यापासून महिलेचे उपजीविकाचे प्रश्न मार्गी लागणार आहे असे यावेळी बि.डी.ओ. बमनोटे यांनी माहिती देतांना सांगीतले.याउद्देशाने महिलांच्या उपजीविकामध्ये वाढ व्हावी व त्यांच्या वस्तूंना मार्केटिंग मिळावी हा उद्देश समोर ठेवून पंचायत समितीच्या पटांगनात दि. 22 जुन मंगळवार ला अपेक्षा महिला बचत गट यांचे “कोप शॉप” सुरू करण्यात आले. या कार्यक्रमाला श्री. बंधाटे पंचायत समिती सदस्य, श्री. प्रदीप बमनोटे गट विकास अधिकारी, श्री. शशिकांत तालमले तालुका अभियान व्यवस्थापक,

श्री. गेयेन्द्र ठाकरे तालुका व्यवस्थापक, श्री. अमोल मरसकोल्हे प्रभाग समन्वय, श्रीमती वृशाली पडोळे प्रभाग समन्वय, श्रीमती सुवर्णलता दिवटे प्रभाग समन्वय, अपेक्षा महिला बचत गट मधील महिला यावेळी उपस्थित होते.

बचत गटांनी तयार केलेले विविध खाद्य पदार्थ, शोभेचे वस्तु, पापड, सेवई इत्यादी वस्तु विक्रीसाठी ठेवण्यात आले असून त्या दिवशी त्यांची विक्री 4500/- रु. एवढी झाली. त्यातून महिलांचा उपजीविकेसाठी नियोजन करून मार्ग मोकळा करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here