उत्तर प्रदेशातील हाथरस येथे मुलीवर झालेल्या बलात्कार व हत्येच्या निषेधार्थ लातुर येथे एन डी एम जे च्या वतीने निवेदन…

जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकासह दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी.

अहमदपूर – बालाजी तोरणे

ऑक्टोबर 2020 उत्तर प्रदेशातील हाथरस येथे नुकत्याच झालेल्या क्रूर सामूहिक बलात्कार आणि हत्येप्रकरणी मुक्त निष्पक्ष आणि निपक्षपाती तपास करून खटला जलदगतीने साठ दिवसात निकाली काढून आरोपींना फाशीची शिक्षा देऊन पुढील कुटुंबांना नैसर्गिक न्याय द्यावा अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना आज नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस अर्थात एन डी एम जे संघटनेच्या वतीने देण्यात आले.

यावेळी लातूर निवासी उपजिल्हाधिकारी यांनी हे निवेदन स्वीकारून पुढील कार्यवाही प्रस्तावित केले. ते लवकरच संबंधित कार्यालयाकडे पाठविण्यात येईल असे आश्‍वासन दिले. या निवेदनामध्ये पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मुलीच्या मृत शरीराची रातोरात विल्हेवाट लावणाऱ्या व पीडित कुटुंबाला शेवटचा अंत्यसंस्कार करण्याचा अधिकार नाकारणाऱ्या हाथरस जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी जिल्हा पोलिस अधीक्षक आणि संबंधित पोलिस कर्मचारी यांच्यावर पुरावा नष्ट करणे,

तिच्या शेवटच्या अंत्यसंस्काराचा अनादर करणे गैर कायदेशीररित्या बंदी करणे धमकी देणे पिडीत कुटुंबावर हल्ला करणे व इतर गुन्हे या करिता अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम आणि नियमानुसार कलम 3(1)(आर),(एस), 3(2)(5अ,) आणि भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 297, 201, 323, 324, 340, 342, 504, 506, नुसार गुन्हे दाखल करण्यात यावेत यासह हिन्दी व मराठी भाषेत निवेदन सादर करुन सविस्तर असे वृत्तांत नमूद केले आहे.

या निवेदनाच्या प्रति माननीय राष्ट्रपती, भारत सरकार ,देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल महाराष्ट्र राज्य मुंबई, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश सरकारचे मुख्यमंत्री, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग नवी दिल्ली व अनुसूचित जाती जमाती आयोग महाराष्ट्र राज्य मुंबई यांना पाठवण्यात आले आहेत.

या निवेदनावर नॅशनल दलीत मुव्हमेंट फॉर जस्टीज NDMJ महाराष्ट्र मराठवाडा उपाध्यक्ष संजय कांबळे माकेगावकर राज्य निरिक्षक दिलीप आदमाने,एनडीएमजेचे जिल्हाध्यक्ष सावन सिरसाठ,संघटक बाबासाहेब वाघमारे, सहसंघटक शिवाजी गायकवाड,पवन कांबळे सेलूकर, समन्वयक सुशिलकुमार वाघमारे, विलास ढगे, जितेंद्र कुमार सुर्यवंशी,समाधान सुर्यवंशी, सुमनताई गायकवाड,पपिता रणदिवे, अविनाश सवाई आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here