“SOME – ONE” या हिंदी सिनेमाचं लातूर कनेक्शन..!

हैद्राबाद – अमित तिकटे

SOME-ONE हा हिंदी सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे हैद्राबाद येथील युवा कलावंतांनी मिळून या सिनेमाची निर्मिती केली आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन सीड भगवत्थूला यांनी केलं आहे.

सीड भगवत्थूला हे दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेते साई कुमार यांचे पुतणे आहेत. निर्मितिची बाजू साई कुमार यांच्या मार्गदर्शना खाली झाली असून आहे. निर्मिती ची जबाबदारी उदय किरण पुपेडडी यांनी बघितली आहे. सिनेमाचं कथानक हे , अतिशय गंभीर आणि प्रेक्षकांना धरून ठेवणार आहे.

शहरात राहणाऱ्या नवरा बायकोची ही गोष्ट आहे, नवीन लग्ना नंतर च रोमान्स आणि त्या नंतर घरात नवीन येणाऱ्या बाळाच्या स्वागताची तयारी त्यात अचानक झालेला गर्भपात, यातून निर्माण झालेली शांतता त्या पुढं घडत जाणाऱ्या घटनांच्या भवती फिरणार हे कथानक आहे.

या सिनेमाचं एक लातूर कनेक्शन ही आहे ! – आपल्या लातूरच्या गायिका स्वप्नाली गायकवाड हिने या सिनेमा साठी एक Duet गान गायलं आहे हे गाणं ही लवकरच प्रदर्शित होईल. या जोडीदार गायकाचे नाव मात्र गुलदस्त्यात ठेवलंय.

Spoon Feed Cinemas & Infinite Entertainments या संस्था हा सिनेमा OTT माध्यमातून लवकरच प्रेक्षकांन पर्यंत पोहचवतील अशी अपेक्षा आहे. “मी ही प्रेक्षकांच्या प्रतिक्रिये साठी खूप उत्सुक आहे” अशी माहिती दिग्दर्शक सिड यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here