हिवरखेड मध्ये मोठा सागवान साठा जप्त…

अकोट वन्यजीव विभागाच्या कार्यवाही मध्ये लाखो रुपयांचा सागवान सह आरामशीन जप्त, आरोपी फरार होण्यात यशस्वी.

अकोट – अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुका अंतर्गत येत असलेल्या हिवरखेड गावात आज वन्यजीव विभाग मार्फत लाकडाची तस्करी करणाऱ्यांवर मोठी धाडसी कार्यवाही करण्यात आली, या कार्यवाही मध्ये लक्षावधी रुपयाचे सागवान लाकूड जप्त करण्यात आली. ही कारवाई हिवरखेड येथिल बंदूकपुरा, गोर्धा वेस भागात करण्यात आली.

वन्यजीव विभागाला मिळालेल्या गोपनीय माहिती वरून हिवरखेड गावातील बंदुकपूरा भागात एका व्यक्तीच्या घरात अवैधरित्या सागवानची लाकडे साठवून ठेण्यात आल्याच्या माहितीवरून वान येथील वन परिक्षेत्र अधिकारी प्रवीण पाटील व नरनाळा अभयारण्य चे वन परिक्षेत्र अधिकारी चव्हाण यांच्या नेतृत्वात या ठिकाणी धाड टाकली असता संबंधित व्यक्तीच्या अवैध साठवणूक केलेल्या लाखो रुपयांचे सागवान जप्त करण्यात आले.

या मध्ये एका आरा मशीन वर सुद्धा वन विभाग मार्फत जप्त करण्यात आली असल्याचे समजते. हे सागवान याव्यक्ती ने कधी व कुठून आणले या बाबत वन्यजीव विभाग अधिक तपास करीत असून वन्यजीव अधिकारी यांनी घटना स्थळाचा पंचनामा करीत संपूर्ण सागवान जप्त केले आहे.

या सागवान तस्करी मधील खरा सूत्रधार कोण याबाबत अधिक तपास वन्यजीव विभाग मार्फत करण्यात येत आहे. ही कारवाई अकोट वन्यजीव विभागाचे उपवन संरक्षक व ACf यांच्या मार्गदर्शनात वान येथील वन परिक्षेत्र अधिकारी प्रवीण पाटील व नरनाळा अभयारण्यचे वन परिक्षेत्र अधिकारी विश्वनाथ चव्हाण,

वनपाल एस एस झोटे, कैलास चौधरी, एस एस तायडे, कराड मॅडम, बळीराम सरकटे, मयुर थूटे, नितीन नागरे, रामेश्वर काकडे, एस बी मुंडे, तुरुक मॅडम, कावळे मॅडम, ताटके मॅडम, माला बेठेकर, सविता सावलकर, एस एल गवई, श्रीकांत गवळी, प्रल्हाद निंबोकार, इत्यादींनी ही धाडसी कारवाई केली.

त्यांच्या सोबतीला हिवरखेड ठाणेदार आशिष लवंगळे, विठ्ठल वाणी, महादेव नेव्हारे, विनोद गोलाईत, श्रीकृष्ण सोळंके, प्रणिता वाशीमकर, महादेव शेंडे इत्यादींनी या वेळी मोलाचे सहकार्य करून तगडा पोलिस बंदोबस्त ठेवला. आरोपी बासित हा फरार असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here