डहाणू-चिंचणीतील समुद्र किनारी सरकारी जागेवर भूमाफिया पुन्हा सक्रिय होहुन कब्जा…

विनायक पवार..डहाणू

महसूल विभाग डहाणू व चिंचणी ग्रामपंचायत च्या काही आधिकाऱ्याना राजकीय लोकांना हथाशी धरून प्रति गुंटा लाखो प्रमाणे पुन्हा विक्री सुरु.

चिंचणी भागात गट क्रमांक 2475 ही जागा 60 हेक्टर हुन अधिक आहे ,,,यातील काही जागा ह्या चिंचणी समुद्रकिनारी लागून असून त्या मोकळया आहेत सर्वे नंबर 2475 या सरकारी जागेवर आता पुन्हा एकदा डहाणू महसूल कार्यालयातील वरिष्ठ आधिकाऱ्यांना हथाशी धरून पुन्हा भूमाफिया सक्रिय झाले आहेत.

काही दिवसा पूर्वी चिंचणी समुद्रकिनार्‍या लगतच्या सरकारी जागेवर भूमाफियांच्या कडून अतिक्रमण केल्या बाबत चे व्रत पुढारी वृत्तपत्राने प्रसिद्ध केल्यानंतर डहाणू तहसीलदार राहुल सारंग यांनी स्वतः जागेवर येऊन पाहणी करून चौकशी केली होती तत्पूर्वी काही दिवस काम बंद करण्यात आले होते मात्र आता पुन्हा एकदा भूमाफिया सक्रिय होहुन त्यांची विक्री करण्याच्या प्रताप समोर आला आहे.

हेच भु माफिया डहाणू महसूल सरकारी कार्यालयातील अधिकारी व ग्रामपंचायत पदाधिकारी गावातील काही राजकीय नेत्यांना हाताशी धरून या शासकीय जागेवर पुन्हा एकदा कब्जा करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

चिंचनी समुद्र परिसराला आगोदरच अतिक्रमणाचा विळखा मोठय़ा प्रमाणात सुरु आहे मात्र चिंचणी किनारपट्टीवर महसूल व मेरीटाइम विभागा सह चिंचनी ग्रामपंच्यात वर्षानुवर्षे याकडे त्यांच्या अर्थकारणाने दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकानी केला आहे.

चिंचनी गावच्या समुद्र किणाऱ्या परिसरात आधीच अनधिकृत बांधकामेही मोठय़ा प्रमाणात आहेत. मुंबई मेरिटाईम बोर्ड,वनविभाग, महसूल विभाग हा किना-यालगतच्या सरकारी जागेवर दुर्लक्ष करत आसल्याने समुद्र किनारपट्टी वर्ति भूमाफियानी कब्जा केल्याचे दिसत आहे.

चिंचनी गावच्या समुद्र किनारपट्टी लगत संवेदनशील असलेले केंद्र सरकारचे म्हत्वाचे प्रकल्प बीआरसी,T ,A ,P ,S, या ठिकाणी अनुभट्या असताना देखील सुरक्षेचा अती महत्वाचा प्रश्न असतानाही सुरक्षेकडे दुर्लक्ष का केले,
आहे असा सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे.

चिंचणी समुद्र किनारी सह शेजारिल परिसरात ठराविक ठिकाणी संरक्षित वने म्हणून जाहीर केलेल्या समुद्र किनाऱ्यावरील जागेवर राजरोसपणे अतिक्रमण होत आहे. या सरकारी जागा भूमाफिया कडून कब्जा करून ती परस्पर लाखो रूपयांत प्रति गुंटा विकण्याचे प्रकार सुरू झाले आहेत मात्र सरकारी यंत्रणा सुस्त पडल्याचे दिसत आहे.

समुद्र किनारपटी वर्ती चिंचणी ग्रामपंचायतीच्या आशीर्वादानेच सदर अतिक्रमण होत असल्याचा आरोप चिंचणी येथील काही ग्रामस्थांनी केला आहे. तसेच या प्रकाराकडे महसूल विभागाचे,मुबंई मेरिटाइन बोर्ड हेतूपुरस्पर दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही ग्रामस्थ करीत आहेत.

चिंचणी येथील समुद्रकिनाऱ्या वरील सर्वे नंबर 2475 यातील काही क्षेत्र मच्छिमार समाज्या साठी सरकार ने राखीव ठेवले असल्याचे मत काही मच्छिमार नागरिकांन कडून सांगण्यात आले आहे,यातील काही क्षेत्र हे कांदळवनाचे दाट क्षेत्र (डेन्स स्पेस) संरक्षीत वन म्हणून अधिसूचीत करण्यात आले आहे. नियमानुसार या जागेवर कोणतेही बांधकाम करता येत नाही असे असताना ही भूमाफिया कडून सरकारी जागा कब्जा करण्याचा प्रयत्न समोर आल्याने त्यांच्या वर्ती ( एम. पी. टि .)नुसार गुन्हा नोंद करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांना करण्यात आली आहे.

कोड

चिंचणी येथील 2475 सर्व्हे नंबर मधील समुद्र किनारपट्टी ला लागून जमीनीचे काही क्षेत्र हे सरकारी असून त्यामध्ये आता पुन्हा एकदा भूमाफिया सक्रिय होहुन कब्जा लाखो रुपये प्रति गुंटा प्रमाणे विकत आहेत जिल्हाधिकारी यांनी तात्काळ यांची चोकशी करून दोषीवर तात्काळ गुन्हा नोंद करण्यात यावा.

चिंचणी ग्रामस्थ
बाबू दुबळा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here