कोगनोळी येथील श्री दत्तगुरु सौहार्द बँकेत लक्ष्मी पुजन…

कोगनोळी – राहुल मेस्त्री

सहकार क्षेत्रात अल्पावधीतच यश मिळवणारी कोगनोळी ता.निपाणी येथील श्री.दत्तगुरु क्रेडिट सौहार्द सहकारी नि.कोगनोळी येथे लक्ष्मी पुजन मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी सामुहिक रित्या आरती करण्यात आली.

तर लक्ष्मी पुजन श्री.दत्तगुरु क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेचे संस्थापक चेअरमन श्री सचिन खोत यांच्या हस्ते करण्यात आले.या लक्ष्मी पुजनाची धार्मिक विधी येथील अशोक गुरव यांनी केले.याप्रसंगी प्रकाश कदम सर,तुकाराम पाटील गुरुजी,

बँक व्यवस्थापक सागर बालीकाई,कल्लेश माळी, अनुप हेगडे,अनिल पाटील, अनिल नव्हाळे,स्वरा खोत यांच्या सह कर्मचारी वर्ग, हितचिंतक व सभासद वर्ग उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here