लाखपुरी टाकळी घाट गणेश विसर्जनसाठी सज्ज, ठाणेदार जी एस पांडव कळून उपाययोजना…

मूर्तिज़ापुर – नरेंद्र खवले

मूर्तिज़ापुर व दर्यापुर तालुक्यातील दरवर्षी तिर्थक्षेत्र लाखपुरी येथे विसर्जन साठी येणारे सार्वजनिक व घरघुती गणेश मूर्तिकरिता यावर्षी महापुरमुळे लाखपुरी गावात गाळ साचला असल्याने विसर्जन साठी लाखपुरी टाकळी येथील लहान पुल निश्चित करण्यात आला आहे. येणाऱ्या शनिवार व रविवार रोजी श्री गणेश मूर्ती विसर्जन असल्याने गुरुवारी मूर्तिज़ापुर ग्रामीण ठाणेदार जी एस पांडव यांनी लाखपुरी व टाकळी येथील आफतकालीन पथक, स्वयंसेवक यांच्याशी चर्चा करुन विविध उपाययोजना केल्या.

यावेळी ठाणेदार जी एस पांडव ,पीएसआय बोरोकार, हे कॅा लांजेवार पो कॉ खेडकर यांच्यासह श्री लक्षेक्ष्वर संस्थान अध्यक्ष राजु दहापुते टाकळी पो पा शकील पटेल, लाखपुरी तंटामुक्ति अध्यक्ष नजाकत पटेल , लाखपुरी पो पा दिगम्बर नाचने ,स्वयंसेवक व आफतकालीन पथकाचे सदस्य ओम बनभेरू, सुरज कैथवास, शेख वाजिद, सचिन तामसे, कैलास श्रीनाथ, रेहान पटेल, जितु कैथवास, वसीम पटेल, संजय सुरदुसे, प्रवीण सुरदुसे, शे सलीम, जगन सुरदुसे, विजय तामसे इत्यादि उपस्थित होते.

शनिवार व रविवारला श्री गणेश मूर्ती विसर्जनाची वेळ सकाळी 7 ते दुपारी 5 पर्यंत राहील. कोरोना निर्बंधामुळे सार्वजनिक गणेश मंडळाच्या 4 सदस्यानी व घरघुती दोन सदस्यानी मूर्ती विसर्जन करिता यावे. लहान मुलांना अणु नये. विसर्जन सोहळा सुरळीत पार पळावा यासाठी सर्वांनी नियमांचे पालन करावे.
ठाणेदार जी एस पांडव
ग्रा पो स्टे मूर्तिज़ापुर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here