मालगुजारी तलाव नगरपरिषदेकडे हस्तांतराची अधिकृत माहिती अद्याप कार्यालयात नाही – मुख्याधिकारी ठोंबरे…

बिलोली – रत्नाकर जाधव

बिलोली येथील मालगुजारी तलाव नगरपरिषदेकडे हस्तांतर केल्याची अधिकृत लेखी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अद्याप न.प.कार्यालयात प्राप्त झाली नसल्याची माहिती मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांनी दिली आहे.

येथील मालगुजारी तलाव नगरपरिषदेकडे हस्तांतरित करावा यासाठी २०१८ मध्ये न.प.च्या सभेत ठराव घेण्यात आला होता.त्यानुसार या बाबतीत जिल्हाधिकारी कार्यालयात पाठपुरावा करत असल्याची माहिती सत्ताधाऱ्यांकडून देण्यात येत होती.परंतु काल पर्यन्त या बाबतीत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कुठलाही निर्णय घेण्यात आला नव्हता.

या बाबतीत विद्यमान नगराध्यक्षांनी जिल्हाधिकारी कार्यलया समोर आमरण उपोषणाची औपचारिकता पूर्ण केली होती.काल दि.७ एप्रिल रोजी तलाव हस्तांतराची बाबतीत जिल्हाधिकारी यांच्याशी विद्यमान नगराध्यक्षांची बैठक झाल्याचे समजते. त्यानुसार नगराध्यक्षांनी सर्व माध्यमांच्या प्रतिनिधींना मालगुजारी तलाव नगरपरिषदेकडे हस्तांतरित करण्याची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याचे सांगितले.

या बाबत नगरपरिषद प्रशासनाकडून अधिकच अधिकृत माहिती मिळवण्यासाठी मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांची भ्रमणध्वनी द्वारे संपर्क केला असता तलावाच्या हस्तांतराबाबतीत अद्याप नागरपरिषदेला अधिकृत लेखी माहिती प्राप्त झाल्याचे म्हंटले आहे.

त्यामुळे या बाबतीत बिलोलीकरांचा पुन्हा भ्रमनिराश का?असा तर्कवितर्क लावल्या जात आहे. अनेक वर्षे रेंगाळत पडलेले प्रश्न या दोन महिन्यात युद्ध पातळीवर मार्गी लावण्याचे नेमके असे सोडवले जात आहेत या बदल चर्चेला उधाण आले आहे.

मुळात मालगुजारी तलाव नागरपरिषदेत हस्तांतरित करण्यासाठी २०१५ पासून बाबू पानकर,लक्ष्मणराव जाधव(गुरुजी),स्वर्गीय जी.एस.गादगे,नरसीमा यांच्यासह अनेक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी २०१५ पासून प्रयत्न केले आहेत.केवळ सत्तेत आल्यामुळे नगराध्यक्षांनी श्रेय लाटण्यासाठी प्रसार माध्यमांची गैरसमजूत करून श्रेय लाटण्याचा हा प्रकार आसल्याची चर्चा होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here