नागपुरातील लेडी डॉन पिंकी वर्माची हत्या !…चित्रपटाप्रमाणे घडला हत्येचा थरार…

न्यूज डेस्क – नागपुर शहरातील पाचपावली भागात एका लेडी डॉनचा गुंडांनी पाठलाग करून तिच्यावर चाकूने सपासप वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सदर थरारक घटनेनं नागपूर शहर हादरलं.

गुन्हेगारी जगतातील ओळख असलेल्या पिंकी वर्मा हिचा तिच्या भागात चांगलाच दरारा होता मात्र काल संध्याकाळी पाचपावली भागात तिला आपला जीव वाचवण्यासाठी सैरावैरा लोकांच्या दारात, घरात व मोहल्ल्याच्या रस्त्याने पळत होती आणि गुंड चाकू घेऊन तिच्या पाठीमागे धावत होते. ती किंचाळत होती. मदतीची याचा करत होती,

पण कोणी तिच्या मदतीला धावून आले नाही. गुंड तिच्या शरीरावर चाकूने सपासफ वार करत तिचा पाठलाग करत होते. शेवटचा प्रयत्न म्हणून ती स्वतःच्या घरात शिरली. गुंडांनी तिथे पण तिचा पिच्छा सोडला नाही. जखमेतून निघणाऱ्या रक्ताने भिजली, चाकूच्या वाराने तिचे कपडे फाटले व शेवटी ती खचली आणि खाली कोसळली. गुंडांनी आणखी वार केले व तेथून निघून गेले. रुग्णालयात पोहचण्या आधीच तिने प्राण सोडला.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले या प्रकरणाची पोलिसांनी दखल घेतली असून आरोपीची ओळख पटली असून पोलिसांची पथके आरोपीचा शोध घेत होती. एखाद्या चित्रपटात घडावा तसा हा घटनाक्रम होता. त्यामुळे या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here