मजुरांच्या ईपीएफ खात्या अभावी नगरपरिषदेचे सर्वच खाते होल्ड…कर्मचाऱ्यांच्या पगारीसह इतर सर्व आर्थिक व्यवहार बंद?

बिलोली :- रत्नाकर जाधव

कामगारांच्या ईपीएफ खाते संबधीत कामांच्या गुत्तेदाराने काढले नसल्यामुळे बिलोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या पगारीसह सर्वच आर्थिक व्यवहाराचे खाते होल्ड करण्यात आले असल्याची अधिकृत माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारीसह सर्वच आर्थिक व्यवहार दोन महिन्यांपासून बंद असल्याची माहिती समोर आली आहे.

बिलोली नगरपरिषदेच्या वतीने घनकचरा व्यवस्थापन ठेकेदार व इमारत बांधकाम,रस्ते व नाल्यांचे बांधकाम गुत्तेदारांकडून शासनाच्या नियमानुसार कामावरील कामगारांचे ईपीएफ खाते व त्यांचे इन्शुरन्स करणे आवश्यक आहे.परंतु संबंधित गुत्तेदाराकडून मजुरांचे ईपीएफ खाते व इन्शुरन्स काढले नसल्यामुळे सध्या बिलोली नगरपरिषदेचे सर्व आर्थिक व्यवहाराचे खाते होल्ड करण्यात आल्याची माहिती समोर येत असून यामुळे नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या पगारी पासून गुत्तेदारांचे ही इतर सर्व आर्थिक व्यवहार बंद झाले आहेत. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून कर्मचाऱ्यांच्या पगारी नाहीत त्याच बरोबर ठेकेदारांकडून करून घेण्यात आलेल्या व प्रगती पथावर असलेल्या कांमाचे देयकही ठप्प असल्याची माहिती समोर आली आहे.यामुळे न.प.च्या कर्मचाऱ्यांची आर्थिक हेळसांड होत आहे.

विशेष म्हणजे नगरपरिषदे अंतर्गत घनकचरा व्यवस्थापनचे प्रत्यक्ष काम करणारे व शासनाच्या भविष्य निर्वाह निधीच्या (ईपीएफ)खात्यात दुसऱ्याच कामगारांची यादी शासनाकडे दिली जाते.तर शासनाच्या नियमानुसार कोणत्याही कामाचे जेंव्हा ई-टेंडरिंग केले जाते त्याचवेळी मजुरांचे ईपीएफ खाते व कामावरील मजुरांचे इन्शुरन्स काढण्याची अट आहे.परंतु सध्या वैशिष्ट्य पूर्ण योजनेच्या अनुदानातुन शहरात होत असलेल्या वाचनालय इमारतीच्या बांधकाम व सिमेंट रस्ते व नाल्यांचे बांधकाम त्याच बरोबर घनकचरा व्यवस्थापणाकडून दररोज ज्या कामगारांकडून ठेकेदार काम करून घेतात त्या मजुरांचे इन्शुरन्स व ईपीएफ खाते काढले नसल्याची बाब पुढे येत आहे.आणि याच कारणामुळे बिलोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या पगारीसह शहरात होत असलेल्या इतर कामांचे दयेक देण्या संदर्भात अडचण येत आहे.

या सर्व कारणांसाठी नगरपरिषदेचे सर्वच खाती होल्ड करण्यात आल्याचे समजते.या बाबतीत मुख्याधिकारी एस.व्ही.नरावाड, लेखापाल गिरी व बांधकाम अभियंता शुभम आचमारे यांच्याशी भ्रमणध्वनी वरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता सबधितांकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही.त्यामुळे नगरपरिषदेचे सर्व खाती कशामुळे होल्ड करण्यात आली याचा मचकूर समजला नाही.नेमकं कोणामुळे हा प्रकार झाला,याला जबाबदार प्रशासन की ठेकेदार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here