सन उत्सवांच्या पार्श्वभूमीवर माना पोलिसांचा कुरुंम रूट मार्च…

मूर्तिजापूर – आगामी काळात साजरा करण्यात येणारा गणेशोत्सव तसेच ईतर उत्सव या सणांच्या पार्श्वभूमीवर मूर्तिजापुर तालुक्यातील कुरुम हे गाव संवेदनशील म्हणून ओळखल्या जाते. कुरुम येथे कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहावी म्हणुन यासाठी माना पोलीस स्टेशन अंतर्गत १५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान कुरुम येथील गावाच्या मुख्यमार्गाने तसेच मिश्र वस्तीतून व संवेदनशील भागातून पोलिसांचा रूट मार्च काढण्यात आला.

यावेळी माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार कैलास भगत , पोलीस उपनिरीक्षक घनश्याम पाटील,पोलीस उपनिरीक्षक शिल्पा धुर्वे, कुरुम बिटचे हेड जमादार दिलीप नागोलकर, माना बिटचे जमादार पंजाब इंगळे , शेलुबाजार बिटचे जमादार देवानंद दंदी, प्रदीप उमक, नंदकिशोर टिकार, शेगोकार, शिपाई निलेश इंगळे, राजेश डोंगरे, उमेश हरमकर, शशिकांत इंगळे, रमाकांत वाघमारे, गृह रक्षक दलाचे अनील कुर्हेकर, दिलीप वाडेकर व पोलीस कर्मचारी रूट मार्च मध्ये सहभागी झाले होते.

यावेळी सणासुदीच्या काळात योग्य तो बंदोबस्त ठेवत कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहावी यासाठी पोलीस प्रशासनाने सज्ज राहावे अशा सूचना माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार कैलास भगत यांनी दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here