सांगली – ज्योती मोरे
मिरज येथे कृष्णा वेणी उत्सव समितीच्या वतीने मिरज कृष्णा घाट येथे कृष्णा वेणी नद्यांचा कृष्णामाई उत्सव आणि महारथी संपन्न झाली. रविवार दिनांक 13 फेब्रुवारी रोजी हा कार्यक्रम साजरा झाला. कृष्णामाई उत्सव समितीच्या वतीने दरवर्षी हा उत्सव मिरज कृष्णा घाट येथे साजरा केला जातो.
दिनांक 12 फेब्रुवारी रोजी नदी आणि परिसरातील स्वच्छता मोहीम आणि 13 फेब्रुवारी रोजी सकाळी मिरज ब्राह्मणपूरी येथील श्री अंबाबाई मंदिर येथून पालखीने सुरुवात झाली. दत्त मंदिर मिरज येथे पर्यंत ही पालखी काढण्यात आली त्यानंतर कृष्णा घाट मिरज येथील कृष्णामाई मंदिरापासून पुन्हा ही पालखी कृष्णा घाट नदीपात्र पर्यंत ही पालखी आणण्यात आली. त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठापना पंचोपचार पूजा. अभिषेक इत्यादी कार्यक्रम सकाळच्या वेळेत करण्यात आले.
पालखीचे ठिकठिकाणी नागरिकांच्या वतीने उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. सायंकाळी चार वाजता भजन, पाच वाजता, सौ शुभदा पाटकर, कल्याणी पटवर्धन, कुमारी मुक्ता पटवर्धन यांच्या कथावली तहा वेगवेगळ्या गोष्टींचा कार्यक्रम करण्यात आला. सहा वाजता प्लास्टिक निर्मूलन आणि पर्यावरण या विषयाची जनजागृती करणारी माहिती सौ अनिता पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उपस्थितांना दिली.

संध्याकाळी साडेसहा वाजता आमिषा करंबेळकर आणि शिष्या यांचा कर्थक नृत्याविष्कार हा कार्यक्रम करण्यात आला संध्याकाळी सात वाजता कृष्णामाईची महाआरती करण्यात आली. यावेळी आमदार सुरेश भाऊ खाडे, श्री गोपाळ राजे पटवर्धन, सौ पद्माराजे पटवर्धन, श्री किशोर पटवर्धन, सौ इरावती पटवर्धन, श्री विवेक शेटे, श्री महादेव अण्णा कुरणे, अर्जु नवाडच्या सरपंच सौ स्वाती कोळी, श्री प्रमोद कोळी, अर्जुनवाढचे पंच श्री विकास पाटील, श्री माधव गाडगीळ, श्री मोहन वनखंडे सर, सौ अनिता वनखंडे नगरसेविका,
दुर्गादेवी शिंदे म्हैसाळकर, सौ सुमन ताई खाडे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. संध्याकाळी साडेसात वाजता मिरजेतील श्री विनोद गोरे, श्री ज्येष्ठराज गोळे श्री संतोष कुलकर्णी श्री विनायक तोरो,पुरोहितांनी मंत्रपुष्प, आशीर्वच,न आणि नदी पवित्रतेची प्रार्थना करण्यात आली. त्याचबरोबर सदे सत वाजता, श्री हेरंब साठे यांचे किर्तन सेवा करण्यात आली. समितीचे निमंत्रक श्री ओमकार शुक्ल यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण कार्यक्रम साजरा करण्यात आला यासाठी श्री दिगंबर कुलकर्णी,

सौ रुपाली देसाई, सौ अनघा कुलकर्णी, श्री निलेश साठे, श्री ऋषिकेश कुलकर्णी, भालचंद्र शुक्ल, दौलत नाथांनी, स्केटिंग कूच श्री मनोज यादव,सौ सुचिता बर्वे, सौ सुप्रिया जोशी,श्री सुनील मोरे, श्री पोपटराव गोरे, श्री अनिल हंबर, सौ पल्लवी प्रभूदेसाई, श्री राजन काकीरडे, सौ ज्योती शुक्ल, सौ अपर्णा सोनीकर, एडवोकेट चंद्रशेखर कुलकर्णी,
श्री एडवोकेट प्रसाद देशपांडे, सौ नम्रता साठे, सौ सुजाता भोरे माधुरी कापसे, सौ रश्मी जाधव, सौ सुजाता रक्तवान श्री विनायक इंगळे, श्री अरविंद रुपलग, श्री कुश आठवले, श्री ऋषिकेश गाडगीळ श्री नरेंद्र कुंडलकर, भास्कर कुलकर्णी यांचे सहकार्य आणि नियोजन लाभले. सौ प्रज्ञा म्हेत्रे यांनी सूत्रसंचालन केले ओमकार शुक्ल यांनी स्वागत केले सौ रुपाली देसाई यांनी आभार मानले.