कृषी संजीवनी सप्ताह अंतर्गत रामटेक तालूक्यातील गावाना भेटी देऊन कृषी संजीवनी सप्ताह साजरा केला…

राजू कापसे
रामटेक

मौजा भिलेवाडा,येथे तापेश्वरजी वैद्य कृषी सभापती जि.प.नागपूर यांनी अरूण खडसे व जनार्दन भगत तसेच अभिनव सेंन्द्रीय स्वयंसहाय्यता शेतकरी गटाला भेट देऊन गांडूळ खत दशपर्णी अर्क जीवामृत तसेच सेंन्द्रीय शेतीतून पिकवलेल्या काळ्या धानाची पाहणी केली,,बोरडा येथिल चंद्र भान धोटे यांच्या शेतात भेट देऊन रेशीम उत्पादन व तूती लागवडीविषयी जाणून घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

मौजा मानापुर येथे उमाकांत पोफळे व दर्याराव संपत वांढरे यांच्या शेतावर जावुन हळद व संत्रा फळ बागेची पाहनी केली तसेच पट्टा पद्धतीने धानाची लागवडीची पाहणी करून तालूका कृषी अधिकारी एस.एस.माने आणि मंडळ अधिकारी सुनिल सातपुते यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले..


तसेच प्रगतीशील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमासाठी जि प सदस्य श्री. सतिशभाऊ डोंगरे, जि.प.सदस्य संजयभाऊ झाडे, पं. स. सभापती सौ. कलाताई ठाकरे पं स. सदस्या सौ. सरोदे, बोरडा सरपंच जगदीश अडमाची, उपसरपंच ईश्वर पगारे, ग्रा. पं. सदस्या सौ. सुनिता नारनवरे, कू. उज्वला जांभूळे, प्रतिक ठाकूर, अंकिता जिवतोडे पोलीस पाटील ईश्वर महाजन,

उपविभागीय कृषी अधिकारी अंबादास मिसाळ, तालुका कृषी अधिकारी स्वप्निल माने, मंडळ कृषी अधिकारी श्री. सुनिल सातपुते, कृषी अधिकारी पं. स.श्री. छन्ने, विस्तार अधिकारी कू. लेन्डे, ग्राम विकास अधिकारी श्री. फूके, तलाठी हर्षना रोडगे कृषी सहायक कू. मेघा नागे, कृषी मित्र श्री दुर्गेश तोंडरे, भगवान भागडकर, सत्कार मूर्ती श्री. चंद्रभान धोटे तसेच रामटेक तालूक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here