रामटेक तालूक्यात २१ जुन ते १ जूलै या काळात कृषी संजीवनी अभियान राबविण्यात आले…

या कार्यक्रमाचा समारोप तालूक्यातील मसला या गावात प्रागतशिल शेतकरी सुमेध धावडे यांच्या शेतात कार्यक्रम घेण्यात आला…

रामटेक – राजु कापसे

१ जुलै हा दिवस कृषी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. राज्यातील शेतकरी समुद्ध आणि आर्थिकदृष्ट्या मजबुत होण्यासाठी आजच्या काळात बळीराजा आर्थिकदृष्ट्या स्वंयपूर्ण होणे फार आवश्यक आहे, त्यासाठी शेतकऱ्यांना अद्यावत कृषी तंत्रज्ञान मिळणे गरजेचे आहे. यासाठी कृषी संजीवनी सप्ताहांच्या माध्यामतून हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना मिळेल, असा विश्वास स्वप्नील माने तालूका कृषी अधिकारी यांनी व्यक्त केला आहे.

तालूका कृषी विभाचे अधिकारी तसेच पंचायत समितीचे अधिकारी कृषी संजीवनी सप्ताहाच्या निमित्ताने शेतकरी बांधवांना भेटून, खते, सुधारित, बियाणे, आधुनिक तंत्रज्ञान यांची माहिती शेतकऱ्यांना देत आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, यामध्ये पिकांची उत्पादकता, गुणवत्ता व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे या त्रिसुत्रीचा वापर कृषी विभाग करीत आहे. यासाठी कृषी अधिकारी, कर्मचारी, कृषी विभाग,

कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक उत्पादनवाढीसाठी नवनवीन तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन करीत आहे..तालूका कृषी विभाग पंचायत समिती वन विभागाच्या मार्फत शेतकऱ्यांसाठी रब्बी पिक योजना घेण्यात आली होती..यात गहु हरभरा गटातील विजेता शेतकऱ्यांना प्रोत्साहन बक्षिसे तसेच सन्मान पत्र देऊन स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला.

गहू गटात सुरेश कुथे रा.किरणापुर प्रती हे.४१क्विं गव्हाचे उत्पादन घेऊन प्रथम पारितोषिक पटकविण्याचा मान मिळविला.द्वितीय पारितोषिक .भोलाराम बिरणवार रा.नगरधन प्रती हे. ३७क्वि.तर तृतीय पारितोषिक रविंद्र भोंदे रा.शिरपुर प्रती हे.३४क्विंटल…हरभरा पिकामध्ये गजेंद्र सावजी रा पटगोवरी प्रती हे.३५.२६ क्विंटल चे उत्पादन घेऊन प्रथम पारितोषिक.

द्वितीय सुंदरलाल कान्बते रा .पटगोवरी प्रती हे.३१.१५ क्विंटल तृतीय पारीतोषिक विजेते काशिनाथ तोंडरे रा.सराखा यांनी प्रती हे. २७.७१ क्विंटल उत्पादन घेऊन यांचा यावेळी गौरव करण्यात आला…या प्रसंगी तालूक्याचे कृषि अधिकारी स्वाप्निल माने, धनराज खोरगे कृषी अधिकारी पंचायत समिती रामटेक.. खंडविकास अधिकारी प्रदीप बमनोटे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री.बोलके आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here