क्रांती सूर्य फुले यांची जयंती ही दिवाळी सणासारखी साजरी व्हावी – हर्षदिप सोनपसारे…

बुलडाणा

बुलडाणा बस्थानकावर कोविडचे सर्व नियम पाळून १९४ वी फुले जयंती दरवर्षी प्रमाणे साजरी करण्यात आली त्यावेळी सोनपसारे बोलतांना म्हणाले महात्मा ज्योतिबा फुले यांनी संपूर्ण भारतीयांच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश पेरला. त्यांच्यामुळेच आजरोजी प्रशासन व इतरही क्षेत्रामध्ये सर्वांना समान संधी प्राप्त झाली आहे.

स्त्रियांच्या कल्याणासाठी त्यांनी केलेले कार्य अनमोल असेच आहे. शेतकऱ्यांसाठी लिहिलेला आसूड व इतरही ग्रंथ आजही समाजाला प्रेरक आहेत. म्हणून फुले यांची जयंती ही दिवाळी सणासारखी साजरी व्हावी,

असे विचार कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेचे माजी डेपोध्यक्ष हर्षदिप सोनपसारे यांनी क्रांतीसूर्य थोर समाज सुधारक स्रियांचे उदारक आम्हाला आईवडीलांपेक्षाही प्रिय असणारे जोतीबा फुले यांच्या जयंती निमित्त बुलडाणा बस्थानकावरील महात्मा फुले यांच्या प्रतिमेला दिपप्रज्वलन करून हार घालुन अभिवादन केले,

वरिल विचार मांडले व उपस्थित बुलडाणा राप कर्मचाऱ्यानी पुष्प वाहून अभिवादन केले यावेळी सेनेचे विभागीय सचिव विजय पवार, कास्ट्राईबचे डेपो सचिव अवसरमोल, दिपक मिसाळकर, जितेंद्र साळवे, पी.आर.जाधव, एन.एन.खरे, म्याक्यानिक यरमुले, विनोद वाहूळे, वाहक बावस्कर व इत्यादी रापचे कर्मचारी व सर्व संघटनेचे पदाधिकारी हजर होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here